भिवंडी दि २० मैत्रिणी सोबत कार मधून जाणाऱ्या तरुणावर अचानक जीवघेणा हल्ला करून त्याच्या व मैत्रणीकडील मोबाईल व सोन्याचे दागिने घेऊन फरार झालेल्या चोरट्यांना कोनगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अब्दुल कादिर अबरार शेख (वय २४ वर्षे, रा. मोईवाडा, कल्याण,प) , उमर अब्दुल रहेमान मन्सुरी ( वय २४ वर्षे, रा. गोविंदवाडी, कल्याण, प), निहाल नजीर शेख (वय २३ वर्ष रा, गोविंदवाडी, कल्याण,प) अशी अटक केलेल्या लुटारूंची नावे आहेत. तर या चोरट्यांकडून चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्या दोघांनाही अटक केली आहे. आकाश राजेश कंडारे (वय २४ वर्षे),सलमान उर्फ नजीब मस्जीद शेख (वय २७ वर्ष) असे चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या अटक आरोपींचे नावे आहेत. कार समोर दुचाकी आडवी लावून लुटमारी .. ठाणे शहरातील पाचपाखाडी भागात राहणारे दर्शिल हितेश गुढ़का वय २७ वर्ष ) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत १२ आक्टोंबरच्या मध्यरात्री मारुती रिटस कारने भिवडी पाईपलाईन रोडने डोगराळीकडुन घरी ठाणे येथे जात होते. त्यावेळी अचानक रेल्वे पुलाखाली अनोळखी तिन जणांनी त्याच्या कार समोरच दुचाकी आडवी लावून उभी केली. विचारपूस करण्यासाठी दर्शिल कार मधून बाहेर पडताच तिघा चोरटयांनी त्याचा मोबाईल हिसकावला तसेच मैत्रीणकडीलही मोबाईल, तिच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील सोन्याची अंगठी असा एकूण ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने काढून घेतला. त्यावेळी दर्शिलने चोरट्यासोबत प्रतिकार केला असता त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार करून मुद्देमाल घेऊन घटनस्थळावरून फरार झाले. तर चोरट्यांच्या हल्ल्यात दर्शिल याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात विविध भादवि कलमानुसार गुन्हा दाखल केला. मात्र याघटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातारवण निर्माण झाले. तीन पोलीस पथकाने शोध घेऊन आरोपीसह मुद्देमाल केला हस्तगत .. चोरटयांनी गुन्हा करताना निर्जनस्थळ व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन केला होता. त्यामुळे पोलिसांकडे हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कुठलाही सुगावा नसल्याने पोलिसांसोर मोठ आव्हान होते. या गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पोलीस पथके नेमली होती. त्यांनतर पोलीस तपासात व गुप्त बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हयातील अब्दुल कादिर अबरार शेख, उमर अब्दुल रहेमान मन्सुरी, निहाल नजीर शेख, यांना कल्याणमधून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, तिघांनाही गुन्हा केल्याचे कुबल केले. मात्र लुटमारीतील मुद्देमाल इतर दोघांना विक्री केल्याने मुद्देमाला हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचून आकाश राजेश कंडारे, आणि सलमान उर्फ नजीब मस्जीद शेख दोघांनाही अटक करून त्यांच्याकडून चोरीचा विकत घेतलेला मुद्देमाल जप्त केला. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली आहे. पाचही आरोपी सराईत गुन्हेगार .. गुन्हयाच्या प्रकरणी अटक केलेल्या पाचही आरोपींचा कोनगाव पोलिसांनी अधिक तपास केला असता, आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले. आरोपी अब्दुल कादिर अवरार शेख ३ गंभीर गुन्हे, उमर अब्दुल रहेमान मन्सुरी ३ गुन्हे , निहाल नजीर शेख १४ गुन्हे आणि चोरीचा मुद्देमाला विकत घेणाऱ्या आकाश याच्यावर तब्बल १४ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त योगेश चव्हाण यांनी दिली. तर हा गुन्हा उघडकीस सपोनि किरणकुमार वाघ आणि गुहे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक पराग भाट यांच्यासह पथकाने कामगीरी बजावली आहे.
ठाणे : काका पुतणीच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना समोर आली आहे. १६ वर्षीय अल्पवयीन पुतणीवर ४८ वर्षीय काकाने बलात्कार केल्याची घटना भिवडी तालुक्यातील एका गावात घडली आहे. धक्कदायक बाब म्हणजे पीडित अल्पवयीन मुलगी अपंग आहेअसून याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३७६ सह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी नराधम काकाला बेड्या ठोकल्या आहेत. पीडिता मानिसकदृष्ट्या दबावाखाली . भिवंडी तालुक्यातील एका गावात पीडित अपंग अल्पवीयन मुलगी कुटुंबासह राहते. तर त्याच गावात नराधम काका ही राहतो. काही दिवसापूर्वी नराधम काकाने अल्पवयीन पुतणीवर बळजबरीने बलात्कार केला. मात्र या घटनेमुळे अपंग असलेली पीडिता मानिसकदृष्ट्या दबावाखाली होती. त्यामुळे घरच्यांनी तिच्याकडे रविवारी चौकशी केली असता, अत्याचाराची घटना समोर आली. त्यांनतर पीडितेच्या कुटूंबाने भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन पीडितेवर घडलेला प्रसंग सांगताच, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणीही करण्यात येऊन नराधम काकावर बलात्कारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला न्यायालयात हजर करणार .. दाखल गुन्ह्यावरून आरोपी काकाचा ठाणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी शोध सुरू केला असता, त्याला भिवंडी तालुक्यातील नाईकपाडा येथून अटक केल्याची माहिती पोलीस अधिकऱ्यानी दिली आहे. ज्याची अधिक चौकशी पोलीस करीत असून आज आरोपीला न्यायालयात हजर कऱण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
सत्याचा वेध घेणारे, अन्यायाविरुद्ध लढणारे- साप्ताहिक – मुंबई जनसत्ता सदैव आपल्या सोबत आहे .सामान्य जनतेच्या हक्कासाठी जागृत असणारे वृत्तपत्र आता न्यूज पोर्टल क्षेत्रात पदार्पण करीत आहे . प्रत्येक बातमीला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहोत
Mumbai Jansatta is a Marthi news paper and website for cover Breaking news, Latest news, Bmc news, Politics news, Entertainment news and Exclusive news ..
© 2021 Mumbai Jansatta. All rights reserved