ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

प्रियकरासाठी रक्ताच्या नात्याचा बळी दिला – पोटच्या पोरीने जन्मदात्या आईचाच खून केला

ठाणे – प्रेम आंधळे असते असे म्हटले जाते पण आता आंधळे प्रेम करणारी तरुण मुले किती कृतगन असतात हेच बघायला मिळत आहे. अल्पवयीन मुलीच्या प्रेमाला तिच्या आईचा विरोध होता. त्यामुळे चिडलेल्या मुलीने रक्ताच्या नात्याचा जराही विचार न करता सरळ प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या आईचाच खून केला या प्रकरणी पोलीस फरारी तरुणी आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत

ठाणे जिल्ह्यात आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासला गेल्याची घटना समोर आली आहे. मुंब्रा परिसरात एका 17 वर्षीय मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या आईची निर्घृण हत्या केली. मृत महिलेला तिची मुलगी आणि प्रियकर यांच्यातील संबंधांवर आक्षेप होता. मुंब्रा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना बुधवारी मुंब्रा परिसरात घडली. घटनेनंतर प्रियकर आणि प्रेयसी दोन्ही आरोपी फरार आहेत. मुंब्रा पोलीस आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. मृत महिलेचे वय 37 होते. मृत महिला आपल्या किशोरवयीन मुलीला या मुलाशी मैत्री करण्यावरुन रागावली होती. यामुळे या तरुणीला राग आला होता. त्यामुळे मृत महिलेच्या मुलीने प्रियकराच्या मदतीने आपल्या आईला मारण्याचा कट रचला.

तसेच संधी मिळताच आपल्या आईची चाकूने वार करत हत्या केली. यानंतर मृताच्या मुलगी आपल्या प्रियकरासह फरार झाली आहे. त्यानंतर महिलेच्या एका नातेवाईकाने तिला फोन केला पण तिने प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, जेव्हा पोलीस पीडितेच्या घरी पोहोचले आणि दरवाजा तोडला तेव्हा त्यांना महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला.

error: Content is protected !!