शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर
मुंबई/ऑन लाईन अभ्यासक्रम सुरू असताना ऑफ लाईन परीक्षा का घेतली जात आहे असा सवाल करीत काल असंख्य विद्यार्थी हिंदुस्तानी भावू उर्फ विकास पाठक याच्या इशर्यावरून रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धरावी येथील निवासस्थानी उग्र आंदोलन केले यावेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता
कोरोना काळात शाळा बंद असताना फी वसूल केली जाऊ नये असे सरकारचे आदेश होते तरीही काही शाळा फी वसूल करीत होत्या याबाबत विद्यार्थ्यांमध्ये असंतोष होता त्यातच दहावी बारावीची परीक्षा ऑफ लाईन पद्धतीने घेण्याचे जाहीर झाल्यामुळे हा असंतोष अधिक वाढला आणि सध्या सोशल मीडियावर हिंदुस्तानी भाऊ म्हणून फेमस असलेल्या विकास पथक याने या प्रश्नावर गेल्या चार दिवसांपासून नाराज विद्यार्थ्यांशी संपर्क ठेऊन रस्त्यावर उतरण्याची योजना आखली त्यानुसार आज दुपारी मुंबईच्या धरावी येथील शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवस्थना बाहेर हजारो विद्यार्थी जमले आणि घोषणा बाजी करू लागले अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस सुधा गडबडून गेले मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जादा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आणि त्यानंतर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला तसेच काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले यावेळी घटनास्थळी असलेल्या हिंदुस्तानी भाऊला ही तेथून जायला सांगण्यात आले. दरम्यान या बाबत बोलताना हिंदुस्तानी भाऊने सांगितले की विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची कुणीही दाखल घत नव्हते त्यामुळे ते माझ्याकडे आले आणि मी त्यांना पाठिंबा दिला तर दुसरीकडे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण राज्य मंत्री बच्च कडू यांनी मात्र या आंदोलन बद्दल नाराजी व्यक्त करीत जर काही सामस्या होत्या तर अगोदर आमच्याशी संपर्क साधून चर्चा करायला हवी होती असे आंदोलन करून कोरोना काळात गर्दी जमवणे चुकीचे आहे दरम्यान विद्यार्थ्यांना भडकवणाऱ्या हिंदुस्थानी भाऊची सरकारने गंभीर दाखल घेतली असून त्याची चौकशी केली जाणार असल्याचे समजते
बॉक्स
आज बैठक
सोमवारी झालेल्या विद्यार्थांच्या आंदोलनानंतर आज शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी एक बैठक बोलावली असून या बैठकीला हिंदुस्तानी भाऊ यालाही बोलावण्यात आले आहे या भाठकित वर्ष गायकवाड आणि बचच्य कडू विद्यार्थ्यांच्या समस्या एकूण त्यावर तोडगा कडण्याची शक्यता आहे