ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महापालिकामहाराष्ट्रमुंबईराजकीय

एकावे ते नवल! निवडणुकीसाठी औरंगाबाद मध्ये भन्नाट जाहिरात


निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे
औरंगाबाद/ निवडणूक आयोगाने भलेही अजून महाराष्ट्रातील १८ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केलेली नसली तरी सर्व राजकीय पक्षांनी तसेच अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे मात्र या सर्व घडामोडीत एका पोस्तरणे केवळ औरंगाबादच्या नागरिकांचे च नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.या जाहिरातीचे शीर्षक आहे ” निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे” सध्या ही जाहिरात संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली आहे
औरंगाबाद मधील खाजगी व्यवसाय करणारे रमेश विनायक पाटील यांना राजकारणाची आवड असून यावेळी त्यांनी पालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे .मात्र निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दोन पेक्षा अधिक मुले असलेल्या माणसाला निवडणूक लढवता येत नाही रमेश पाटील यांना तीन मुले आहेत त्यामुळे ते स्वतः निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अपात्र आहेत पण त्यांनी माघार घेतली नाही यावर त्यांनी एक भन्नाट उपाय शोधला आहे त्यांनी चक्क निवडणुकीसाठी बायको पाहिजे अशी जाहिरात दिली आहे .या जाहिरातीत शिक्षणाची अट नाही केवळ बायको २५ ते ४० या वयोगटातील असावी आणि तिला राजकारणाची आवड असावी तेवढीच माफक अपेक्षा आहे
रमेश पाटील यांची ही जाहिरात सध्या खूप गाजतेय सोशल मीडियावर सुधा या जाहिरातीची चर्चा आहे कारण निवडणुकीच्या इतिहासात आजवर कोणीही अशी जाहिरात केलेली नव्हती त्यामुळे रमेश पाटील यांची ही जाहिरात औरंगाबाद पालिका निवडणुकीत गमतीचा आणि चर्चेचा विषय बनली आहे

error: Content is protected !!