ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

औषधांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता


मुंबई – अगोदरच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेला आता आरोग्याच्या संकटाचा अधिक तिरतेने मुकाबला करावा लागणार आहे. कारण औषधांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना महासाथीच्या काळापासून ते आतापर्यंत काही औषधांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात १०० टक्के वाढ झाली आहे. पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्समध्ये सुधारणा झाल्यानंतरही कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतीने फार्मा उद्योगांची चिंता वाढवली आहे. चीनमधून आयात केलेल्या अ‍ॅझिथ्रोमायसिन आणि अमोक्सिसिलिनसह हाय वॅल्यूड अॅण्टीबायोटिक औषधांच्या किंमतीत वाढ झाली आहे. काही औषधांसाठी भारताला चीनवर अवलंबून राहावे लागते. जीवनसत्त्वे ब आणि ड सह इतर जीवनसत्त्वांच्या औषधांच्या किंमती देखील चीनमधून आयातीवर अवलंबून असतात.
, महत्त्वाच्या अॅण्टीबायोटिक औषधांसह अॅण्टी-ट्यूबरक्युलोसिस रिफाम्पिसिन आणि अॅण्टी-डायबिटीज मेटफॉर्मिन आदी औषधांची कोरोना महासाथीपूर्वीच्या दराच्या तुलनेत सध्या दुप्पट दराने विक्री होत आहे. ही औषधे परदेशातून मोठ्या प्रमाणात आयात केली जातात. मागील काही वर्षांत आयात वाढली असून त्याच्या खर्चातही वाढ झाली आहे.

error: Content is protected !!