ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्र सरकारने सणांवरचे निर्बंध अखेर हटविले -गुढी पाडव्याच्या शोभायात्रा परवानगी

मुंबई/ कोरोणचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अखेर काल सरकारने सनांवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे उद्या गुढी पाडवा दणक्यात साजरा होणार आहे शोभायात्रा काढण्यास परवानगी देण्यात आली आहे जनतेने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे
कोरोनामुळे सरकारने पॅन्डनिक ॲक्ट अन्वये सणांमध्ये होणारी गर्दी रोखण्यासाठी काही निर्बंध घातले होते पण आता कॉरोणा जवळपास संपलेला आहे सगळे व्यापार उद्योग सुरू झाले आहेत शाळा कॉलेज सुरू झालीत त्यामुळे आता सनांवर असलेले निर्बंध हटवा अशी जनतेतून मागणी केली जात होती भाजपने तर हिंदूंच्या सणांवर निर्बंध का ? असा सवाल केला आणि त्यानंतर गुढी पाडव्याच्या शोभा यात्रांवरून शिवसेना भाजपा मध्ये मोठा वाद रंगला होता आरोप प्रत्यारोपणाची चीखाफेक सुरू होती अखेर काल मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यात सर्व सणांच्या वरील निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे गुढीपाडवा मोहरम आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे खास करून गुडी पाडव्याच्या शोभा यंत्रांवर जी बंदी घालण्यात आली होती ती बंदी हटवण्यात आला आहे त्यामुळे उद्या संपूर्ण महाराष्ट्रात ढोल ताशांच्या गजरात शोभा यात्रा निघतील उद्याचे वातावरण खऱ्या अर्थाने मंगल मयी असेल.

error: Content is protected !!