ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

रस्त्यावर नमाज पडन्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला- राज ठाकरे

औरंगाबाद/मशिदींवरील भोंग्यांबबत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुस्लिमांना 4 मे पर्यंतचा अल्टीमेंट दिला आहे.4 मे नंतर मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत तर मशिदिसमोर तुम्ही भोंगे लाऊन त्यावर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठाण करा असे सांगितले आहे तसेच जर उत्तर प्रदेशातील मशिदींवरील भोंगे उतरवले जाऊ शकतात मग महाराष्ट्रातल्या मशिदींवरील भोंगे का उतरवले जात नाहीत.त्याच बरोबर रस्त्यावर नमाज पडण्याचा अधिकार या लोकांना कोणी दिला असा सवालही त्यांनी केला
औरंगाबादच्या सांस्कृतिक मैदानावर राज ठाकरे यांची रेकॉर्ड ब्रेक सभा झाली या सभेला तुफान गर्दी लोटली होती संपूर्ण मैदान भरून मैदानाच्या बाहेरही लोक उभे होते राज ठाकरे यांनी सुरवातीला पवारांवर हल्ला चढवला माझ्या दोन सभा होताच बरेच जण फडफडयाला लागले . माझ्या सभा होऊ नयेत म्हणून प्रयत्न करू लागले पण कोंबडे झाकून ठेवले म्हणून सुरू उगवायचा थांबतो का ? माझ्या भाषणांमुळे म्हणे जातीय विद्वेष पसरतो पण राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासून खऱ्या अर्थाने जातीय विद्वेष पसरायला लागले . माझे बाबा नास्तिक आहेत स्वतः सुप्रियाने संसदेत सांगितले माझ्या सभेनंतर पवारांना देव आठवला मंदिरात जायला लागले असेही पवार म्हणाले राज ठाकरे यांनी त्यांच्या आजोबांची पुस्तके वाचावीत असे पवार म्हणतात त्यामुळे राज ठाकरे यांनी सभेला येताना प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातील उतारे वाचून दाखवले तसेच जेम्स लेनचा नावाने बाबासाहेब पुरंदरेना कसे टार्गेट केले जाते याबाबत जेम्स लेंच्या मुलाखतीचा काही भाग दाखवला

error: Content is protected !!