ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली- चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट


संभाजी नगर – राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. मात्र शिंदे गटाकडून सरकार स्थिर असून, मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच राहणार असल्यचं सांगण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारचे कमी दिवस उरले आहेत, भाजपकडून मुख्यमंत्री बदलासाठी चाचपणी सुरू असल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारचे कमी दिवस उरले आहेत. भाजपकडून मुख्यमंत्री बदलासाठी चाचपणी सुरू झाली आहे. हे सरकार लवकरच पडणार आहे. न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात लागणार आहे, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे भाजपाने मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू केली आहे. या सरकारचे कमी दिवस उरल्याचं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला होता. दिल्लीतून मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. शिंदे गटाची गरज संपली आहे, त्यामुळे भाजप मुख्यमंत्री बदलण्याची शक्यता असल्याचाही टोला त्यांनी लगावला होता.

error: Content is protected !!