सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्यास न्यायालयाची मंजुरी
मुंबई – अनिल देशमुख यांच्या शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात सीबीआयला सर्व प्रकारची माहिती माहिती पुरवून चांगली मदत केल्याबद्दल सीबीआयच्या शिफारशीवरून सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार बनवले आहे. दरम्यान या निर्णयाला विरोध करणारा या प्रकरणातील एक आरोपी कुंदन शिंदे याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाल्याने १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात अनिल देशमुख आणि त्यांच्या साथीदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच तसेच १०० कोटींच्या खंडणी प्रकरणातील आणखी माहिती समोर येणार आहे. खास करून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत जे आर्थिक व्यवहार झाले होते त्यात कोणाकोणाचा सहभाग होता हि माहिती सुधा उघडकीस येणार आहे. परिणामी या प्रकरणात आणखी काही मासे सीबीआयच्या जाळ्यात अडकणार आहेत तर वाझेचा जामिनावर सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .
माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप केला होता.. आपल्या आरोपात त्यांनी म्हटले होते कि अनिल देशमुख यांनी काही वादग्रस्त प्रकरणांमध्ये १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते त्यानुसार वाझे वसुली करीत होते . दरम्यान अंटलीया येथील स्फोटकांची गाडी पकडल्यानंतर त्यात वाझे यांचे नाव आले आणि त्यात त्यांना अटक झाली त्यानंतर मनसुख हिरेन प्रकरणात सुधा वाझे यांचा सहभाग आढळला होता तेन्व्हापासुन्ते तुरुंगात आहेत द्तर १०० कोटींच्या खंडणी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने जो चांदीवाल आयोग नेमला होता त्या आयोगासमोर सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांची चौकशी झाली होती . पण सचिन वाझे यांनी सीबीआय च्या चौकशीत अनिल देशमुख कशाप्रकार खंडणी वसूल करायचे त्त्यात त्यांना कोण कोण मदत करायचे याबाबतची माहिती आणि पुरावे सीबी आयला दिले आणि त्यानंतर आपल्याला माफीचा साक्षीदार करावे अशी सीबीआय न्यायालयाला विनंती केली त्यासाठी आपला कबुली जबाब एका बंद वाढल्या आहेत आता १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यान मध्ये सामील असलेल्यांच्या अडचणी वाढणार आहेत . अनिल परब यांचेही या प्रकरणात नाव असल्याने त्यांच्याही अडचणी वाढणार आहेत तसेच मनी लोन्द्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांना जामीन मिळणे आतालीफाफ्यातून न्यायालयाला दिला . त्यानंतर सीबीआयने सुधा नी सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करावे असा अर्ज न्यायालयात सदर केला तो न्यायालयाने स्वीकारला आणि आज सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार करण्यास परवानगी दिली दरम्यान सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्यास या प्रकरणातील एक आरोपी कुंदन शिंदे याने विरोध केला त्यावर वाझेचे वकील रौनक नाईक यांनी सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल वाचून दाखवीत सह आरोपीला माफीचा साक्षीदार करण्याची कायद्यात तरतूद आहे असा युक्तिवाद केला तो न्यायालयाने मान्य करून सचिन वाझेला माफीचा साक्षीदार केले आहे. सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाल्याने अनिल देशमुख कुंदन शिंदे तसेच पलांडे यांच्या अडचणी खूपच कठीण आहे