ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मोदी हे अनिल अंबनीचे चौकीदार

गंगानगर/ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे चौकीदार नसून अनिल अंबानीचे चौकीदार आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
राजस्थानातील गंगा नगर येथील जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी यांनी उपस्थितांना विचारले की तुम्ही कधी शेतकऱ्याच्या घराबाहेर चौकीदार पहिला आहे का ? तुम्ही कधी कुठल्या कष्टकरी कामगाराच्या घराबाहेर चौकीदार पाहिलं आहे का ? नाही पाहिलं असणार कारण या लोकांच्या घरात चोरून नेण्यासारखे काहीच नाही पण अंबानींच्या घरी मात्र चौकीदार आहे आणि त्याचे नाव आहे मोदी! मित्रानो 2014 च्या निवडणुकीत मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते 2 कोटी तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते काय झालं त्याच? मोदी केवळ आश्वासने देतात त्यांना फक्त त्यांचेमित्र अंबानी आणि अडाणी यांची काळजी आहे समान्य माणसाशी त्यांना घेणे देणे नाही धर्माच्या नावावर मते मागून सता मिळवणे हेच मोदी आणि त्यांच्या पक्षाचे धोरण असल्याचे राहुल गांधींनी सांगितले.

error: Content is protected !!