ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

म्हाडाच्या १५ इमारती धोकादायक जाहीर

मुंबई: म्हाडाकडून मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या अशा १५ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या वर्षी अतिधोकादायक जाहीर करण्यात आलेल्या सात इमारतींचा समावेश आहे. या अतिधोकदायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये ४२४ निवासी आणि१२१ अनिवासी असे एकूण ५४५ रहिवासी राहत असल्याची माहिती आहे. रहिवाशांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे आणि कार्यवाहीस सहकार्य करण्याचे इमारत दुरूस्ती मंडळाने आवाहन केलं आहे.
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहर बेटावरील जुन्या तसेच मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये १५ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत.

म्हाडाकडून जाहीर करण्यात आलेल्या१५ अतिधोकादायक इमारतींची यादी पुढीलप्रमाणे :

इमारत क्रमांक४-४ए,नवरोजी हिल रोड क्र. 1, जॉली चेंबर (मागील वर्षीच्या यादीतील)
इमारत क्रमांक ७४ निझाम स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील)
इमारत क्रमांक ४२, मस्जिद स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील)
इमारत क्रमांक६१-६१ए , मस्जिद स्ट्रीट
इमारत क्रमांक २१२ जे पांजरपोळ लेन)इमारत क्रमांक १७३-१७५-१७९ व्ही के बिल्डिंग , प्रिन्सेस स्ट्रीट, काळबादेवी
इमारत क्रमांक २-४-६ नानुभाई देसाई रोड, मुंबई
इमारत क्रमांक १-२३ नानुभाई देसाई रोड, मुंबई
इमारत क्रमांक ३५१ ए, जे एस एस रोड मुंबई
इमारत क्रमांक ३८७-३९१ बदामवाडी, व्ही .पी. रोड (मागील वर्षीच्या यादीतील)
इमारत क्रमांक १७ नारायण निवास , निकटवाडी
इमारत क्रमांक ३१सी व ३३ए ,आर रांगणेकर मार्ग व १९ पुरंदरे मार्ग, गिरगावचौपाटी (मागील वर्षीच्या यादीतील)
इमारत क्रमांक १०४-१०६,मेघजी बिल्डिंग, अ , ब व क विंग , शिवदास चापसी मार्ग (मागील वर्षीच्या यादीतील)
) इमारत क्रमांक ४० कामाठीपुरा ४ थी गल्ली
अंतिम भूखंड क्र. ७२१ व ७२४ टीपीएस – ३ विभाग, इमारत क्रमांक ४० बी व ४२८ , आत्माराम बिल्डिंग व पेनकर चाळ (मागील वर्षीच्या यादीतील)

error: Content is protected !!