ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

फडणवीसांचा महाराष्ट्राला धक्का- एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर फडणवीस उप मुख्यमंत्री


मुंबई/ राजकारणात धक्कातंत्र ही फक्त पवारांनीच मक्तेदारी होती पण देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यापेक्षा दोन पावले पुढे निघाले शिंदेंच्या बंडपासून ते नव्या सरकारच्या सतास्थापनेत मुख्य सुत्रधार फडणवीस होते त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील असे वाटले होते पण त्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवून संपूर्ण महाराष्ट्राला धक्का दिला आहे .
शिंदेंच्या बंडा पासून त्या सर्व आमदारांना बडोदा,गोहाती आणि आता गोव्यात नेऊन ठेवण्यापर्यंतच्या सर्व घडामोडीत फडणवीस यांचा अर्थातच सहभाग होता ‘ त्यानंतर फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेऊन बहुमत चाचणीची मागणी केली .ती राज्यपालांनी मान्य करून सरकारला बहुमत चाचणीचे आदेश दिले त्याविरुद्ध सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले तिथे या मुद्द्यावर साडेतीन तास सुनावणी झाल्यावर न्यायालयाने बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिला . त्यामुळे उधव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यानंतर फडणवीसांनी सरकार बनवण्यासाठी राज्यपालांकडे दावा केला आणि काल एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा केली आता शिंदे,भाजप,आणि अपक्ष अशा 168 जनचे नवे सरकार येणार असून काल शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आता दोन दिवसात मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल
फडणवीसांचा विजय असो
माणसाकडे कुशाग्र बुध्दी, कोणत्या वेळी काय करायला हवे याची समयसूचकता,आणि प्रचड आत्मविश्वास असेल तर माणूस काहीही करू शकतो त्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही.आणि काही माणसांच्या याच बुद्धिमत्तेच्या जोरावर मनुष्य प्राण्याला यशाचे शिखर गाठले आहे. विज्ञानाच्या जोरावर परग्रहावर पाय ठेवण्या पर्यंत प्रगती केली आहे.बुध्दीला संयम आणि आत्मविश्वासाचा जोड असेल तर जगात काहीच अशक्य नाही.आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करावेसे वाटते.2019 च्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही केवळ शिवसेनेने केलेल्या अट्टाहास मुळे सरकार बनवता आले नाही.मात्र आपण हे सरकार पाडून भाजपला पुन्हा सतेत आणि याबाबत फडणवीस यांना आत्मविश्वास होता.म्हणूनच ते म्हणाले होते की मी पुन्हा येईन! लोकांनी त्यावेळी फडणवीसांच्या पुन्हा येईन या वाक्याची थट्टा केली पण फडणवीस शांत राहिले इतर भाजप नेत्यांप्रमाने त्यांनी सरकार पडण्याची भविष्यवाणी करून तारखा दिल्या नाहीत.पण सरकार पाडण्याचा मनोमनी निश्चय केला होता कारण त्यांना पुन्हा सतेत यायचं होत आणि त्यासाठी त्यांनी महाविकास आघाडी सतेवर आल्यापासून योजना आखायला सुरुवात केली होती.अशावेळी हत्ती होऊन लाकडे फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाणेच फायदेशीर असते हे ओळखून त्यांनी सत्ता पक्षातील तिन्ही पक्षांच्या आमदारांशी चांगले संबंध ठेवले.खास करून शिवसेना आमदारांवर अधिक फोकस केला शिवसेना आमदारांमध्ये वेग वेगळ्या कारणांवरून नाराजी होती त्यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे कानामागून येऊन तिखट झालेले मातोश्रीवरचे उद्धव ठाकरेंचे भडभुंजे सरदार! ज्यांचा शिवसेनेच्या जडणघडणीत काडीचाही संबंध नव्हता ज्यांनी सेनेच्या कुठल्याही आंदोलनात भाग घेतला नाही कधी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या नाहीत . केसेस घेतल्या नाहीत असे लोक शिवसेनेच्या निर्णयप्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावू लागले आणि शिवसेनेसाठी रक्त सांडले अशा लोकांचे मातोश्रीवर जाणारे रस्ते अडवू लागले . शिवसेनेचे निष्ठावान लोकप्रतिनिधी आणि पक्षप्रमुख ठाकरे यांच्यातला संपर्क ज्यांनी तोडला अशा लोकांवर शिसेनेतील लोकप्रतिनिधी आणि इतर पदाधिकाऱ्यांची नाराजी होती . त्यामुळे याच नाराज लोकांना फडणवीसांनी हिंदुत्वाची गोळी देऊन सतेची सिडी बनवली.शिवसेनेत काम करणारे लोक हे सर्व सामान्य कुटुंबातले कुणी रिक्षावाला तर कुणी डोगुर आणि हाटील वाला मग अशा लोकांना पटवायला किती वेळ लागतोय फडणवीसांनी तेच केलं.शिवसेनेने सतेसाठ काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाने ही हिंदुत्वाशी गद्दारी आहे असे लोकांना वाटत होते त्यांनाच आपल्या जाळ्यात ओढले आणि शिवसेना फोडली.बाळासाहेबांची शिवसेना अभेद्य होती जो फुटला त्याचा खोपकर झाला. मात्र अशा गोष्टींची दहशत काही काळासाठी असते . कारण खोपकर नंतर भुजबळ,राणे,राज हे फुटले पण त्यांचं काहीच झालं नाही विशेष म्हणजे शिवसेना प्रमुख हयात असताना हे लोक फुटले आणि आणि शिवसेनेच्या प्रक्षोभातून बचावले आणि हीच गोष्ट कदाचित फडणवीसांनी शिंदेंना पटवून दिली असावी .म्हणूनच शिंदेंनी धाडस केलं आणि भाजपच्या पाठिंब्यामुळे त्यांचे बंड यशस्वी झाले . पण यामागे डोकं होत ते अर्थातच फडणविसांचे! त्यांनी शिवसेना फोडून सतेत पुन्हा येण्याचा आपला मार्ग मोकळा केला या मिशन वर ते गेली वर्ष काम करीत होते.आणि हे काम त्यांनी अत्यंत शांत डोक्याने विचार करून आपल्या पक्षातील दिल्लीत बसलेल्या प्रमुख बड्या नेत्यांना विश्वासात घेऊन केलं.महाराष्ट्राच्या राजकारणात अशा गोष्टी फक्त शरद पवारणाच जमत होत्या पण फडणवीसांच्या रूपाने महाराष्ट्रात दुसरे नेते निर्माण झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या खंजिरी राजकारणाला यापुढे पवार असो अगर नसो त्यांची उणीव भासणार नाही कारण खांजिराचा कारखाना बारामतीवरून नागपुरात शिफ्ट झालाय. ही वस्तुस्थिती महाराष्ट्राने मान्य करायलाच हवी .

error: Content is protected !!