भाजपच्या विजयी जल्लोषकडे फडणवीस यांच्यासह दिग्गज भाजप नेत्यांची पाठ- गड आला पण स्वाभिमान गेला
मुंबई/ शिवसेना फोडण्यापासून आघाडी सरकार पडण्यापर्यंत प्रत्येक आघाडीवर भाजपने यश मिळवले आणि राज्यात सत्तांतर घडवून आणले मात्र या सत्तांतर नाट्याचे प्रमुख नायक असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपमुख्यमंत्रीपद नाईलाजाने स्वीकारण्याची वेळ आल्याने ते भाजपच्या जल्लोषात सामील होऊ शकले नाहीत .त्यामुळे गड आला पण स्वाभिमान गेला अशी भाजपची स्थिती झाली आहे .
उदव ठाकरे यानी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर फडणवीस मुख्यमंत्री होतील असे सर्वानाच वाटले होते पण त्यांना पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा होती त्यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचे होते म्हणून त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेच्या नाव सुचवले आणि शिंदे मुख्यमंत्री झाले पण मोदी यांच्यासह केंद्रातील भाजपच्या सर्वच बड्या नेत्यांनी वाटत होते की फडणवीस यांनी सतेत सहभागी व्हावे आणि उपमुख्यमंत्रीपद घ्यावे त्यामुळे फडणवीस यांचा नाईलाज झाला आणि त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली त्यामुळे ते नाराज आहेत . आणि याच नाराजीमुळे त्यांनी भाजपच्या कार्यालयात जो विजयी जल्लोष साजरा झाला त्याकडे पाठ फिरवली त्यांच्या सोबत चंद्रकांतदादा,दरेकर,प्रसाद लाड हेसुद्धा या जल्लोषात सामील झाले नाही याचा अर्थ भाजपात मोठी नाराजी आहे .