येत्या आठ दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार अब्दुल सत्तार यांची हाकलपट्टी होण्याची शक्यता -शिरसाट- सरवणकर यांना संधी?
मुंबई/गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे दोन दिवसांपूर्वी फडणवीस आणि शिंदे यांनी दिल्लीत जाऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपा पक्षश्रेष्ठींची चर्चा केली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की जुलै महिन्यातच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे
नव्या मंत्रिमंडळात संजय शिरसाट यांच्यासह शिवसेना भाजपा महायुतीतील काही आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे केंद्रीय मंत्रिमंडळात ही शिंदे गटाच्या तीन मंत्र्यांना समावेश केला जाणार आहे यामध्ये राहुल शेवाळे भावना गवळी आणि प्रतापराव जाधव या तीन खासदारांचा समावेश आहे केंद्रीय मंत्रिमंडळाचाही याच महिन्यात विस्तार होणार आहे दरम्यान मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपली वर्णी लावण्यासाठी शिंदे गटाचे आणि भाजपचे आमदारही जोरदार प्रयत्न करीत आहेत
शिंदे गट आणि भाजपा सरकार सत्तेवर येऊन आता एक वर्ष झाले या एक वर्षात दोन्हीकडचे प्रत्येकी 9 असे 18 मंत्री सध्या राज्य मंत्रिमंडळात काम करीत आहेत आणि प्रत्येक मंत्र्याकडे चार ते पाच खात्यांचा अधिभार आहे त्यामुळे त्यांना प्रत्येक खात्याला व्यवस्थित न्याय देता येत नाही अनेक खात्याची कामे कोळंबली आहेत म्हणूनच अखेर एक वर्षानंतर का होईना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला