बनावट पासपोर्ट प्रकरणी सी बी आयची मोठी कारवाई मुंबई नाशिक मध्ये 31 ठिकाणी छापे
मुंबई/बनावट पासपोर्ट प्रकरणी सीबीआयने बनावट पासपोर्ट देणाऱ्या दलाल आणि त्यांना मदत करणारे पासपोर्ट खात्यातील अधिकारी यांच्याविरुद्ध आता मोहीम उघडली आहे याच मोहिमे अंतर्गत मुंबई नाशिक आणि इतर ठिकाणी मिळून 33 ठिकाणी सीबीआयने छापे टाकले या छाप्यात बनावट कागदपत्रे आणि त्यासंबंधी अनेक पुराव्याची कागदपत्रे सापडल्याचे समजते
गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मुंबई नाशिक पुणे आणि इतर शहरांमधून बनावट पासपोर्ट दिले जात असल्याची माहिती सरकारकडे आली होती हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने त्याचा तपास सीबीआय कडे देण्यात आला होता या बनावट पासपोर्ट प्रकरणात पासपोर्ट विभागाचे काही अधिकारीही सामील असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते त्यामुळे सीबीआयने ॲक्शन बोर्ड मध्ये येऊन काल मुंबई नाशिक मध्ये छापे टाकायला सुरुवात केली या छाप्यामध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे सीबीआयच्या हाती लागल्याचे समजते विशेष म्हणजे याच्यामध्ये मनी लर्निंग झाल्याचाही संशय आहे कारण काही दलालांकडून परस्पर पासपोर्ट अधिकाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते आता हे पासपोर्ट अधिकारी कोण आणि त्यांचे दलालांशी काय संबंध आहेत आत्तापर्यंत या दोघांच्या व्यवहारांमध्ये किती ट्रांजेक्शन झाले आणि या लोकांनी मिळून आतापर्यंत किती बनावट पासपोर्ट दिलेत बनावट पासपोर्ट दिलेल्यांचे परदेशात काय झाले ते सध्या कुठे काम करतायेत या सगळ्यांची माहिती सीबीआय गोळा करीत आहे सीबीआयच्या या मोठ्या कारवाईमुळे पासपोर्ट खात्यात मोठी खळबळ उडाली असून पासपोर्ट अधिकारी हस्तावले आहेत कोणत्याही क्षणी आपल्या मानेल भोवती फास आवळला जाईल याची त्यांना जाणीव झाली आहेत त्यामुळे काही अधिकारी फरार झाले असल्याचे समजते मात्र ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार असून हे संपूर्ण रॅकेट उध्वस्त करण्याचा सीबीआयने निर्धार केलेला आहे