ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मोदींच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार – विरोधी पक्षाचे सर्व नेते नाराज

पुणे -देशात विरोधी पक्षांची एकजूट दिवसेंदिवस बळकट होत असताना आता शरद पवार यांच्या एका निर्णयामुळे विरोधी पक्षात नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील शरद पवार यांचा मित्रपक्ष असणाऱ्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील यावर नाराज असल्याची माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्टला पुण्यात टिळक स्मारकाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. विशेष बाब म्हणजे याच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. शरद पवारांच्या याच निर्णयामुळे आता विरोधी पक्षात नाराजीचा सूर निर्माण झाल्याची चर्चा आहे.देशात मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरून विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षावर सातत्याने जोरदार टीका केली आहे. मात्र तरी देखील सत्ताधारी पक्षाकडून कुठल्याही प्रकारची भूमिका मणिपूर बाबत जाहीर करण्यात आलेली नाही. या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांचे एक शिष्टमंडळ नुकतच मणिपूरला गेलं होतं.
देश पातळीवर विरोधकांची फळी मोदींना जोरदार विरोध करत असताना राज्यात शिवसेना ठाकरे गट देखील या मुद्द्यावरून केंद्र सरकार विरोधात भूमिका घेत आहे. अशावेळी शरद पवार यांनी मोदींसोबत कार्यक्रमात सहभागी होण्याच्या निर्णयावर ठाकरे गटात नाराजी आहे. शरद पवार यांच्या या निर्णयावरून उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. तर दुसरीकडे, मंगळवारी ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना मधून देखील जोरदार टीका करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

error: Content is protected !!