ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

लग्नाला नकार दिला म्हणून दाऊदने यशश्रीची हत्या केल्याचं उघड – पोलीस टॅटू काढणार्याच्या शोधात

नवी मुंबई : उरण हत्याकांडामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. यशश्री शिंदेंच्या शरीरावर दोन टॅटू असल्याचं पोस्टमॉर्टम अहवालातून समोर आलं आहे. दाऊद शेखच्या नावाने यशश्रीच्या शरीरावर दोन टॅटू असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं. आता पोलिस या टॅटू आर्टिस्टच्या शोधात असून हे टॅटू संमतीने काढण्यात आले होते की जबरदस्तीने याचा शोध घेणार आहेत.
उ रणमधील यशश्री शिंदेंच्या हत्येप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी दाऊद शेखला अटक केली आहे. लग्नाला नकार दिला म्हणून दाऊदने यशश्रीची हत्या केल्याचं त्याच्या जबाबातून उघड झालं. आता यामध्ये टॅटू प्रकरणाची अपडेट आली आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, पोस्टमॉर्टमच्या दरम्यान मृत यशश्री शिंदे हिच्या शरीरावर दोन टॅटू दिसत होते. मृत यशश्री शिंदे हिच्या अंगावर दोन टॅटू सापडले असून त्यावर तिने आरोपी दाऊद शेखचे नाव कोरलं असल्याचं स्पष्ट झालंय. मृताने यशश्रीच्या अंगावर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात हा टॅटू काढला होता आणि हा टॅटू काढताना दाऊद शेखही उपस्थित होता असेही सूत्रांनी सांगितले.
दाऊद शेखने यशश्रीला टॅटू काढण्यास भाग पाडले का? तिच्या संमतीने हे केले गेले का? या प्रश्नांचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. पोलिस या टॅटू आर्टिस्टचा शोध घेत असून त्याचा जबाब नोंदवणार आहेत जेणेकरून टॅटूशी संबंधित माहितीची पडताळणी करता येईल.

error: Content is protected !!