मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र व कोकणात अतिवृष्टी-नद्यांना महापूर चौघे वाहून गेले महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे थैमान
मुंबई/ काही दिवस विश्रांती घेऊन परतलेल्या पावसाने काल मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र,कोकण आणि मुंबईलाही झोडपून काडले उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील नद्यांना महापूर आल्याने या पुरात एका वृध्द महिलेसह चार जन वाहून गेले तसेच गुरेढोरे वाहून गेली शेतात पाणी शिरल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे
मुंबई आणि ठाण्यात काल पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू होती.त्यामुळे सखल भागात पाणी तुंबले त्यामुळे रस्ते वाहतुकीची कोंडी झाली होती मात्र या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला नाही पण उत्तर महाराष्ट्र,कोकण,मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तुफान पाऊस कोसळला खास करून उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्याला पावसाने झोडपून काढले गिरणा, तोत्री आणि डोंगरी या नद्यांना पूर आल्याने वाकडी,रोकडे,वगळू,वागले,खिर्दे, लोंजे,जांभळी,मुदखेड,रहीपुरी आदी १५गावांचा संपर्क तुटला तर पुराच्या पाण्यात कलाबई पांचाळ या वृध्द महिला आणि एक अनोळखी इसम वाहून गेला.या पुरात शेकडो गुरेढोरे वाहून गेली गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हजारो लोकांना एन दी आर एफ ने सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले त्यातच कन्नड घाटात दरड कोसळलीआणि वाहतूक कोलमडली पुराची माहिती कळताच गिरीश महाजन,जिल्हाधिकारी अभिजित राऊत,पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य वेगाने सुरू केले .जळगाव पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार,धुळे या जिल्ह्यांमध्ये सुधा मुसळधार पाऊस होऊन जनजीवन विस्कळीत झाले तर मराठवाड्यातील बीड,जालना,हिंगोली,लातूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊन प्रमुख नद्यांना पूर आला तसेच धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाण्याचा विसर्ग करावा लागला त्यामुळे पाणलोट क्षेत्र परिसरातील काही गावांमध्ये पाणी शिरून अनेक घरे पाण्याखाली गेली यावेळी दोन इसम पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे समजते सध्या या भागात एन डी आर एफ कडून वेगाने बचाव कार्य सुरू आहे. मात्र बीड आणि जलण्या मधील परिस्थिती गंभीर आहे .पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर,सांगली,मिरज,या भागातही मुसळधार पाऊस झाला तर कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाने झोडपून कडल्याने नद्यांच्या पणी पातळीत वाढ होऊन काही गावांमध्ये पाणी शिरले सर्वाधिक पाऊस पालघर जिल्ह्यात झाला,घोळवड,डहाणू,बोर्डी या भागात संततधार सुरू होती.