बँकेतून पैसे काढणारे जेष्ठ नागरिक ठरत आहेत चोरांचे टार्गेट.नेरळ बाजारपेठेत जेष्ठ नागरिकांचे 10हजार चोरीला
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- बँकेतून आपल्या जमा खात्यावरचे पैसे काढण्यासाठी येत असलेले जेष्ठ नागरिक चोरांचे टार्गेट ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.नेरळ बेकरे येथे राहणारे 72 वर्षीय चंद्रकांत हाबळे हे आपल्या नेरळ युनियन बँक येथे असलेल्या बँक खात्यावरील 10 हजार रुपये काढून बाजार खरेदी करायला गेले असता कोणी अज्ञात चोरट्याकडून हात सफाई करत हे पैसे चोरण्यात आले आहे.या बाबत हाबळे यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
72 वर्षीय चंद्रकांत हाबळे हे रेल्वे सेवा निवृत्त कर्मचारी असून त्यांचे नेरळ युनियन बँक येथे जमा खाते आहे.महिना काठची रेल्वे सेवा निवृत्ती मिळकत यांचं खात्यात जमा होत असल्याने,येणारा गणेशोत्सव सण तसेच बुधवार आठवडा बाजार असल्याने घर कामासाठी लागणाऱ्या खरेदीसाठी ते बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते.बँक खात्यावरील 10 हजार रुपये काढून ते नेरळ मुख्य बाजारपेठ येथे चालत असताना कोणी अज्ञात चोरट्यानी हे पैसे हात सफाई करत पळविले आहे.
दरम्यान मुख्य बाजारपेठेला लागून असणाऱ्या या युनियन बँक येथील खातेदार आपल्या खात्यावरील पैसे काढून बाहेर पडल्यानंतर चोरांचे टार्गेट ठरत आहेत. या अगोदर देखील या बँकेतून जेष्ठ महिला आपल्या खात्यावरील एक लाख रुपये काढून घरी परतत असताना तिला अडवून लुटण्यात आले होते. परंतु त्यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष प्रभारी अधिकारी संजय बांगर यांनी 24 तासात त्या चोराच्या मुसक्या आवळल्याने बांगर यांचे सर्व स्थरातून कौतुक होत होते.परंतु आता बँकेतून पैसे काढून निघणारे चंद्रकांत हाबळे हे चोरांचे टार्गेट ठरल्याने त्यांच्या कुटुंबाकडून देखील या बाबत न्याय मिळवून देण्याची मागणी नेरळ पोलिसांकडे होताना दिसत आहे.