ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनिल परब यांना आणखी एक धक्का तिकीट यंत्र खरेदी केल्याप्रकरणी लोकायुक्त चौकशी करणार

: मुंबई – भाजपा नेते सध्या शिवसेनेच्या मागे हात धुवून लागले आहेत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब याना 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात इडीच्या चौकशीला सामोरे जावे लागलेले असतानाच .आता तिकीट यंत्र खरेदी प्रकरणात गुरुवारी लोकायुक्त त्यांची चौकशी करणार आहेत . भाजप नेते मिहिर कोटेचा यांनी सदर प्रकरणी परब यांच्या विरोधात राज्यपाल कोशारी यांच्याकडे तक्रार केली होती .त्यात म्हटले होते की लॉकडाउन काळात आय टी क्षेत्रातील कंपन्यांची वाईट अवस्था झाली होती . त्यामुळे इलेक्ट्रानिक तिकीट यंत्र खरेदी निविदा प्रक्रियेतील एनवेळी बदल करण्याचे आदेश परब यांनी दिले होते . त्यानुसार कंत्राटदारच्या वार्षिक उलाढालीची 150 .कोटी वरुण 100 कोटींवर आणण्यात आली . त्याच बरोबर निविदेतील अटी आणि शर्तीमध्ये आणखी काही बदल करण्यात आले निविदां मधील शर्ती मधील बदल मंजुरीसाठी संचालक मंडळपुढे ठेवावेत अशी सूचना महाव्यवस्थापकांनी केली पण परिवहन मंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि अगोदर निविदा प्रप्र्सिद्ध करावी आणि नंतर तिला संचालक मंडळाची मंजूरी घ्यावी असे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले .मर्जीतील एका कंत्राटदारला काम देण्यात आले त्याचा परिवहन मंडळाला 250 कोटींचा भुर्दंड बसणार आहे . त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करावी अशी कोटेचा यांची मागणी आहे .

error: Content is protected !!