ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

सलग १२ महिने होणार मिठी नदीची स्वच्छता

: मुंबई शहराच्या सौंदर्यात भर घालणारी मात्र वाढत्या नागरीकणामुळे कचऱ्याच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मिठी नदीला मोकळा श्वास घेता येणार असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र शासन तसेच मुंबई महापालिका यांच्या आजवरच्या अथक प्रयत्नानंतर मिठी नदीची स्वच्छता करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय समूहाने पसंती दर्शविली होती. याच पार्श्वभूमीवर फिनलंड येथील एका मोठ्या उद्योग समूहाने ६ लाख युरोचा निधी मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी देणार असल्याचे सांगितले आहे. हुतामाकी असे या उद्योग समूहाचे नाव असून या माध्यमातून निधी देण्यात आलेली क्लीन टेक ही नवउद्यम कंपनी सलग १२ महिने मिठी नदीची स्वच्छता करणार आहे.

अधिक माहितीनुसार, पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधताना आपल्याला नवनवीन कल्पनांचा अवलंब करावा लागतो, नदीतून कचरा उचलण्याच्या पहिल्या प्रयत्नाला चालना देण्यासाठी ज्याचा शोध घेण्यास फिनलँडमधील कंपनी क्लीनटेक या नवउद्यमी उपक्रमाने लावला, यांना आर्थिक मदत म्हणून ६००,००० युरोची देणगी दिली. समुद्रातील टाकाऊ कचर्‍याची समस्या जी जगातील सर्वाधिक मोठी समस्या आहे. त्यावर उपाय करणार्‍या रिव्हररिसायकलचा संकलक महत्त्वाचा घटक आहे. हुतामाकीच्या सहकार्याने एक नमुना कचरा संकलक बनवण्यात आला आणि त्याची फिनलँडमध्ये चाचणी घेण्यात आली. त्यानंतर तो मुंबईत आणला जाऊन त्याची एकसलग बांधणी करण्यात आली आणि ते पुढील १२ महिने मिठी नदीतील कचरा गोळा करणार आहे.

‘’मुंबईच्या महत्त्वाच्या भागातून वाहणार्‍या एकमेव नदी असलेल्या मिठी नदीला स्वच्छ करण्यामध्ये आम्हाला मदत करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये प्रचंड उत्साह वाटत आहे. या प्रकल्पामध्ये प्लास्टिक कचरा संकलित करण्याच्या व त्याचबरोबर स्थानिक समाजांना ज्ञान व उपजीविकेचे साधन प्राप्त करण्यासाठी सक्षम बनवले जात आहे,’’ अशी माहिती हुतामाकीचे पॅकेजिंग विभागाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक असलेले सुदीप माळी यांनी दिली.

error: Content is protected !!