शिराळा तालुक्यातील टाकवे विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती-मुंबई जनसत्ताचे संपादक किसनराव जाधव यांच्या कडून सर्वाचे अभिनंदन
सांगली / शिराळा तालुक्यातील टाकवे विद्यालयाच्या कु.भक्ती सुतार, कु.हर्षदा हिंगणे आणि संस्कार यादव या विद्यार्थी विद्यार्थिनींना एन एम एम एस ची शिष्यवृत्ती मिळाली आहे .वर्षी 12 हजार या प्रमाणे 4 वर्ष ही शिष्यवृत्ती मिळणार आहे .यावेळी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान सारर्थी शिष्यवृत्तीसाठी 6 मुले पात्र ठरली आहेत त्यात कु .धनश्री जाधव, कू. अनवेशा बेंद्रे ,संस्कार पवार, कु सोनाली काळे, कु.तनुजा बोबडे आणि तन्मय शेळके यांचा समावेश आहे या शिष्यवृत्ती अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना वर्षाला 9600 याप्रमाणे 4 वर्ष ही शिष्यवृत्ती मिळणार आहे .या सर्व विद्यार्थ्यांचा टाकवे ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या वतीने सत्कार करण्यात आला,महाविद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी .खाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर भाष्टे यांनी सूत्रसंचालन केले . रमेश सांवत यांनी आभार मानले . विशेष मुंबई जनसत्ताचे संपादक किसनराव जाधव यांनी सर्वाचे अभिनदन केले . मंडळाचे पदाधिकारी विजय भोसले, शंकर जाधव, बाळकृष्ण रावते, ‘विनोद कुंभार, अनिता शेवाळे ‘ प नाईक सर ,आर सी पाटील, रमेश सवाखंडे मान्यवर उपस्थित होते .