ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
राजकीय

देशातील प्रत्येक गरीब माणसाला त्याच्या हक्काचे पक्के घर मिळेल -बाबूभाई भवाणजी

मुंबईचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हणाले की या देशातील कोट्यवधी शेतकरी,कष्टकरी,कामगार तसेच झोपडपट्टी मध्ये राहून मोलमजुरी करून जागणारे गोरगरीब यांच्या डोक्यावर त्यांचे हक्काचे छप्पर असावे यासाठीच केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सारख्या गृह निर्माण योजना राबवायला सुरुवात केली आहे .त्यामुळे पुढील काही काळात देशातील प्रत्येक गरीब माणसाला त्याच्या हक्काचे पक्के घर मिळेल असा विश्वास भाजपा नेते आणि मुंबईचे माजी उपमहापौर बाबूभाई भवाणजी यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात फडणवीस सरकारच्या काळात जनतेसाठी अनेक चांगल्या योजना राबवण्यात आपल्या पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घर या अभियान अंतर्गत सर्वांना घरे प्राप्त व्हावीत यासाठी आमच्या सरकारच्या काळात नियमांमध्ये विविध सुधारणा करण्यात आल्या २०१५ मध्ये याबाबतचा विस्तृत शासनादेश जारी करण्यात आला त्यात म्हाडा,एस आर ए सिडको आदींचा अंतर्भाव करण्यात आला त्यामुळे झोपडपट्टी पुर्णवसनाचे काम जलद होऊ लागले .झोपू योजनांमध्ये बिल्डरांकडून झोपडपट्टी वासियांची फसवणूक होऊ नये म्हणून बिल्डरांना चाप लावण्यासाठी कठोर नियम करण्यात आले त्याचा तेंव्हा झोपडपट्टी वासियांना फायदा झाला आणि भाजपा सदैव आमच्या पाठीशी आहे याची झोपडपट्टी वासियांना खात्री पटली असे बाबूभाई यांनी सांगितले

   

error: Content is protected !!