ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्याराजकीय

ई डी च्या रडार वरील नेत्याकडे सेना नेतृत्वाची पाठ- घोटाळेबाजांना मातोश्रीवर नो एंट्री!


मुंबई/ वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे ई डी च्या रडारवर असलेल्या शिवसेना नेत्यांना तूर्तास कुठलीही मदत करायची नाही असे धोरण शिवसेना नेतृत्वाने स्वीकारल्याचे दिसतेय . त्यामुळेच प्रताप सरनाईक यांच्यापासून भावना गवळी यांच्या पर्यंत कुणालाही सेना नेतृत्वाकडून मदत मिळेनाशी झालीय त्याचाच एक भाग म्हणून ई डी कडून चौकशीची नोटीस मिळालेल्या वाशिम च्या शिवसेना खासदार भावना गवळी यांना मातोश्रीवर अर्धा तास थांबून ही उद्धव ठाकरे यांची भेट मिळालेली नाही त्यामुळे भावना गवळी रिकाम्या हाताने माघारी परतल्या
सध्या भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे हात धुवून शिवसेना नेत्यांच्या मागे लागलेत.अनिल परब यांच्या पाठोपाठ त्यांनी भावना गवळी यांचीही त्यांच्या पाच संस्थांमधील गैरव्यवहार प्रकरणी ई डी कडे तक्रार केल्यानंतर भावना गवळी यांना ई डी ची नोटीस आली होती त्याच संदर्भात त्या मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेल्या होत्या मात्र अर्धा तास थांबून सुधा त्यांना भेट मिळू शकली नाही याचाच अर्थ ई डी च्या रडारवर असलेल्या शिवसेना नेत्यांची पाठराखण करायला सध्या तरी शिवसेना नेतृत्व तयार नाही .या पूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ई डी ने छापे टाकले तेंव्हाही शिवसेना नेतृत्व प्रताप सरनाईक यांच्यासाठी पुढे आले नाही . त्यामुळे नाराज झालेल्या प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पुन्हा भाजपशी युती करण्याचा सल्ला दिला होता .त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब,माझी खासदार आनंदराव अडसूळ यांनाही मदत मिळाली नाही आणि आता भावना गवळी या मातोश्री वरून रिकाम्या हाताने परतल्या त्यावरून भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आणि ई डी कडून चौकशी ची नोटीस आलेल्या शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याला मदत करायची नाही असेच शिवसेना नेतृत्वाचे धोरण असावे मात्र त्यामुळे पक्षात प्रंचड नाराजी वाढली असून त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षावर परिणाम होण्याची शक्यता आहे .


बॉक्स/अडसूळ यांच्यावर अटकेची टांगती तलवार
सिटी को.ऑपरेटिव्ह बँकेतील ९०० कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी ई डी च्या रडारवर असलेल्या आनंदराव अडसूळ यांनी अटक टाळण्यासाठी व खटला रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जी याचिका दाखल केली होती ती न्यायालयाने फेटाळली असून आता अडसूळ पितापुत्र यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.अपक्ष आमदार रवी राणा यांच्या तक्रारीवरून अडसूळ यांच्यावर ई डी ची कारवाई सुरू आ
हे.

error: Content is protected !!