दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळाले पण धास्ती कायम सेनेची नाकाबंदी करण्याचा प्लॅन ?
मुंबई – शिंदे आणि ठाकरे यांच्यात सध्या सुरु असलेला राजकीय संघर्ष पाहता या संघर्षाचा केंद्रबिंदू ठरलेला दसरा मेळावा आता दोघांसाठीही प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. कारण आपलाच दसरा मेळावा मोठा व्हावा यासाठी दोन्हीकडून प्रयत्नांची शिकस्त केली जात आहे . पण शिंदे गटाची राज्यात सत्ता असल्याने आणि फडणवीस गृहमंत्री असल्याने मुंबई बाहेरून येणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना बाहेरच्या बाहेर अडकवले जाऊ शकते आणि दसरा मेळाव्यात शिवसेनेची कोंडी केली जाऊ शकते त्यासाठी शिंदे गटाने खास प्लॅन आखला आहे अशी जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे .
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान मिळावे यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न झाले होते . कारण शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी माईलस्टोन असतो आजवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दरवर्षी शिवाजीपार्कवर दसरा मेळावा घेऊन हिंदुत्वाच्या विचारांचे सोने वाटले त्यामुळे दरवर्षी येथे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील शिवसैनिक विचारांचे सोने लुटायला शिवाजी पार्कवर येतो. बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हि परंपरा कायम ठेवली पण या वर्षी शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे शिवसेना काहीशी कमजोर झाली आहे तर शिवसेनेतील फुटीर आता शिवसेनेवर आपला हक्क सांगत आहेत तसेच त्यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची योजना आखली होती पण न्यायालयीन लढाईत शिवसेनेने त्यांना हरवले. आणि दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळवले त्यामुळे शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानात होणार आहे . मात्र याचा सूड घेण्यासाठी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मुंबई बाहेरून येणाऱ्या शिवसैनिकांना रोखण्याचा शिंदे गट आणि फडणवीस यांनी प्लॅन आखला आहे . जेणेकरून शिवसेनेपेक्षा शिंदे गटाचा दसरा मेळावाअधिक भव्य व्हावा असा त्यामागे हेतू आहे . त्यामुळे दोन्ही गटात दसऱ्याला गोंधळ होऊ नये म्हणून आज शिवसेना नेत्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना या सगळ्या गोष्टींची कल्पना दिल्याचे समजते .