अभिनेता गोविंदा गोळी लागून जखमी
मुंबई/बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा याच्या कडून मिस फायर होऊन त्याच्या गुडघ्याला गोळी लागली. यात गोविंदा जखमी झाला असून त्याच्या पायाला लागलेली गोळी काढण्यात आली आहे. याप्रकरणीपोलीस अधिक तपास करीत आहेत
आज पहाटे पाचच्या सुमारास, गोविंदा आपल्या कारमधून काही कामानिमित्त बाहेर निघाला होता. तत्पूर्वी स्वतःच्या परवानाधारक रिवाल्वर साफ करताना अचानक रिवाल्वर मधून गोळी सुटली. आणि ती गोविंदाच्या गुडघ्याला लागली .यात जखमी झालेल्या गोविंदाला तात्काळ क्रीटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तात्काळ शस्त्रक्रिया करून त्याच्या पायाला लागलेली गोळी काढण्यात आली. त्यानंतर आता गोविंदाची प्रकृती ठीक आहे. मात्र या घटनेमुळे मुंबईत काहीशी खळबळ मागणी आहे. दरम्यान हे नेमकं काय प्रकरण आहे याचा आता पोलीस तपास करणार आहेत.
