फायर बाईक खर्चाचा मुंबईकरांना भुर्दंड का?
मुंबई/ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या काही वर्षांपासून वारंवार आगीच्या घटना घडत आहेत मात्र आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहचतांना गल्ली बोळा मुळे अडचण येते त्यामुळे फायर बाईक च पर्याय शोधण्यात आला आहे.पण फायर बाईक हा काही सक्षम पर्याय नाही मुळात झोपडपट्ट्या आणि गल्ली बोळ कोणामुळे निर्माण झाले? तसेच बेकायदेशीर पार्किंग कडे कोण दुर्लक्ष करीत आहे याचे उत्तर पालिकेने द्यावे.आज मुंबईत अनेक ठिकाणच्या झोपडपट्ट्यांमध्ये अशी परिस्थिती आहे की तिथे आगीची दुर्घटना घडली किंवा घरे कोसळली तर फायर ब्रिगेडची गाडी किंवा रुग्ण वाहिका जाऊ शकत नाही कारण रस्ते अत्यंत चिंचोळा आहेत आणि त्यावरही काही फेरीवाल्यांनी टपऱ्या बांधून अतिक्रमण केले आहे .इमारती बांधताना पार्किंगची व्यवस्था बंधनकारक असते पण एस आर ए च्या इमारती बांधताना कुठेही पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली नाही त्यामुळे या इमारतींमध्ये राहणारे लोक रस्त्यातच त्यांची वाहने पार्क करून रस्ते ब्लॉक करतात अशावेळी अपघात घडला तर तिथे फायर ब्रिगेड कशी पोचणार .
मुंबईत आजकाल टोलेजंग टॉवर उभे राहत आहेत पण तिथे आगीपासून संरक्षण करणारी यंत्रणा लावण्यात आलेली आहे की नाही हे बागण्यापूर्विच या टॉवरना ओ सी म्हणजेच भोगवटा प्रमाणपत्र दिले जाते नुकतीच करी रोड मधील ज्या अविधना टावरला आग लागली होती त्या टॉवर मधील आग प्रतिबंधक सुरक्षा व्यवस्थेबद्दल महापालिकेला संशय आहे .थोडक्यात सांगायचे म्हणजे आग टॉवर असो की झोपडपट्ट्या तिथल्या लोकांच्या आगीच्या सुरक्षेबाबत पालिकेकडून नेहमीच बेफिकिरी दाखवली गेलीय . त्यामुळे आता फायर बायिक घेण्याची पाळी आली आहे .
मात्र २०१८ मध्ये ५फायर बाइक च प्रस्ताव स्थायी समितीत आला होता .पण एकच कंपनी असल्याचे कारण सांगून स्थायी समितीने तो प्रस्ताव नामंजूर केला होता आता २४फायर बाईक खरेदीच्या निविदा मागवल्या जाणार आहेत पण आताही फॉर. Qyuer रेस्क्यू प्रा.ली.या एकाच कंपनीचे टेंडर आलेत आणि ते ३ कोटी १५ लाख ६० हजारांचे आहे .मग स्थायी समिती मागच्या मुद्द्यावराच हे टेंडर नामंजूर करणार का असा सवाल विचारत आहे पण प्रश्न असा आहे की मुंबईत आगी बाबतची असुरक्षितता का निर्माण झाली पालिकेने नको त्या उपाय योजना करण्या पेक्षा या समस्या निर्माणच होणार नाहीत यासाठी प्रयत्न केले असते तर फायर बायीकचा हा तकलादू पर्याय शोधण्याची आवश्यकताच भासली नसती .