ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मुंबई

झोपडीमुक्त मुंबईसाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार सरसावले ; गोपाळ शेट्टी यांची भव्य संकल्प यात्रा संपन्न………

        

मुंबई, दि. (प्रतिनिधी) :  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण हिंदुस्तानला “रन फाॕर युनिटी” चा नारा दिला. याच धर्तीवर उत्तर मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी वाॕक फाॕर स्लम फ्री मुंबई चा नारा देत उत्तर मुंबईच्या ६ विधानसभा मतदार संघातून संकल्प यात्रा सुरू केली. सकाळी ८ वाजता बोरीवली येथील सरदार वल्लभभाई पटेल उद्यानातून खासदार गोपाळ शेट्टी यांनी या यात्रेस प्रारंभ केला.

कांदिवली एज्युकेशन सोसायटीच्या आवारात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा असलेल्या चौकात सर्व ठिकाणीच्या यात्रा एकत्र झाल्या. हजारो चा संख्येने नागरिक आणि भाजप कार्यकर्ते या संकल्प पदयात्रेत सहभागी झाले होते.

खासदार गोपाळ शेट्टी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात झाली.              या प्रसंगी बोलताना खासदार शेट्टी यांनी आपण मुंबईतील रखडलेल्या एसआरए योजना पुन्हा कार्यन्वित व्हाव्यात यासाठी देत असलेल्या लढ्या संदर्भात व प्रयत्ना संदर्भात माहिती देताना आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हाडा,एसआरए प्राधिकरण व संबंधित खात्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना प्रत्यक्ष भेटून आपण चर्चा केली असल्याचे शेट्टी यांनी सांगितले त्याचे फलस्वरुप म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रखडलेल्या एसआरए योजना तात्काळ सुरु करण्यासाठी संबंधित अधिकारी व मंत्रीमहोदयांची बैठक आयोजित करुन रखडलेले प्रकल्प सुरू करण्या बाबबत सूचना केल्या आहेत. या स्लम फ्री संकल्पने बाबत महाराष्ट्राचे राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्या नंतर या योजनेचे त्यांनी कौतुक करत या योजनेला पाठींबा देत आपण करीत असलेल्या प्रयत्नांची स्तुती केली तसेच सर्व अधिकारी वर्गाची तातडीची बैठक देखील आपल्या दालनात घेऊन हे एसआरए प्रकल्प त्वरीत मार्गी लावण्यासाठी निर्देश दिल्याचे शेट्टी यांनी  यावेळी बोलताना सांगितले.                                                आपल्या सर्वांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हायची संधी मिळाली नाहीं. परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त सर्व एकत्र येवून, देशाची एकता आणि झोपडीत राहणाऱ्या नागरिकांना मोफत हक्काच घर व त्यांच्या मूलभूत सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध असून झोपडी मुक्त मुंबई हे अभियान आता संपूर्ण मुंबईभर राबवणार असल्याचे खासदार शेट्टी यांनी या प्रसंगी बोलताना निश्चय व संकल्प व्यक्त  केला.                                      या संकल्प पदयात्रेत भाजपचे जेष्ठ नेते आमदार भाई गिरकर , आ. मनिषा चौधरी, आ. सुनील राणे तसेच उत्तर मुंबईतील सर्व नगरसेवक व मोठ्या प्रमाणात नागरिक व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.भाजप जिल्हाध्यक्ष गणेश खणकर  यांनी आभार प्रदर्शन  केले.

error: Content is protected !!