कुलाब्यातून दहा कोटी डॉलर्सची परदेशी चलन जप्त
मुंबई/सध्या निवडणुकीच्या धामधुमीत अनेक ठिकाणाहून कोट्यावधी रुपये जप्त केले जात आहेत. मतदारांना वाटण्यासाठी नेले जाणारे हे पैसे आता निवडणूक आयोगाच्या ताब्यात आहेt. महाराष्ट्राच्या अनेक भागात कमी अधिक प्रमाणात हा चलनी नोटांचा साठा सापडत असतानाच, आता पुणे ,पालघर आणि उल्हासनगर पाठोपाठ कुलाब्यात दहा कोटी डॉलरचा परदेशी चलनाचा साठा सापडल्याने मोठी खळबळ माजली आहे.
मरीन ड्राईव्ह येथील बालमोहन परिसरात नाकाबंदी सुरू असताना, दहा कोटी परदेशी डॉलरची रक्कम सापडली. हे परदेशी चलन भारतीय चलनात रूपांतरित करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे. कस्टम अधिकाऱ्याकडून देखील या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. विमानतळावरून यासंदर्भात परवानगी होती का याची माहिती घेतली जात आहे. त्यानंतर पुरावा मिळाल्यानंतर ही रक्कम परत करण्याच्या संदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान निवडणुकांच्या काळात सहजपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणानी १५ ते २० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत १८७ कोटी ८८ लाखाची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र कुलाबा येथे सापडलेले हे चलन फार महत्त्वाचे आहे. हे कोणी पाठवले आणि कोणासाठी पाठवले याची आता चौकशी केली जात आहे.