ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

तुकाराम मुंडेंच्या बदली मागे औषध पुरवठादार?

मुंबई/ अवघ्या दोन महिन्यात आरोग्य विभागाच्या संचालक पदावरून तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली मात्र या बदली मागे औषध पुरवठादार व डाँक्टर पुरवठा करणारे कंत्राटदार असल्याचे बोलले जात आहे . काही वेळेवर कामावर न येणारी डॉक्टरही मुंडेंच्या बदली मागे असल्याच्या संशय व्यक्त केला जात आहे . तुकाराम मुंडे यांच्या सारखे प्रामाणिक अधिकारी शासकीय सेवेत एकच पदावर फार काळ टिकत नाहीत तुकाराम मुंडे हे नवी मुंबईचे पालिका आयुक्त असताना सर्वपक्षीय भ्रष्ट नगरसेवकांनी एकत्र येवून त्यांना घालवले . त्यानंतर पुणे महापालिकेच्या परिवहन विभागाला त्यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला पण तिथूनही त्यांना हटवण्यात आले .आतापर्यंत त्यांची 19 वेळा बदली झाली आहे कारण त्यांच्या सारखा प्रामाणिक आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा अधिकारी राज्यकर्ते आणि शासकीय सेवेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना नको असतो .

error: Content is protected !!