शिवाजी महाराजांची एकनाथ शिंदे बरोबर तुलना करणाऱ्या लोढा शेठ विरुद्ध संताप
मुंबई / प्रताप गडावरील शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यावरून सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केल्यामुळे पर्यटन मंत्री लोढा शेठ यांच्या विरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे . राष्ट्रवादी काँग्रेसने लोढाच्या विरोधात आंदोलन करून त्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात बोलताना लोढा आहेत यांनी सांगितले की औरंगजेबाने शिवाजी महाराजांना पकडल्यावर त्यांनी आग्र्याच्या किल्ल्यातून स्वतःची सुटका करून घेतली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले . एकनाथ शिंदे यांनीही अशीच आपल्या सहकाऱ्यांसह स्वतःची सुटका करून घेत भाजपच्या साथीने हिंदुत्ववादी सरकार स्थापन केले .लोढाच्या या विधानाचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत .राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस तसेच इतर सामाजिक संघटना तसेच संभाजीराजे आणि उदयन राजे यांनीही लोढाच्या त्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे . दरम्यान चहूकडे टीका होताच माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला अशी लोढा यांनी केली आहे
छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहेत, त्यांच्याशी कुणीही तुलना करु शकत नाही. मी कधीही वैयक्तिक टीका करत नाही. मला यात पडायचे नाही. मी त्या कार्यक्रमात फक्त उदाहरण दिले आहे, त्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे, असंही मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.