ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

एमपीएससीने निवडलेल्या १११ उमेदवारांना इडब्ल्यूएसची सवलत नाकारली


मुंबई- – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवडलेल्या १११ आणि सर्वसाधारण प्रवर्गातून अर्ज भरलेल्या १११ उमेदवारांच्या नियुक्तीला उच्चं न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाज संतप्त झाला असून त्यांनी नियुक्तीपत्र देण्यासाठी आयोजित केलेल्या वाय बी चव्हाण सेंटर मधील कार्यक्रमात गोंधळ घातला .आता मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न निकालात काढण्याचे आश्वासन दिले आहे.
.

मराठा मोर्चा समन्वयक आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “1143 उमेदवारांना शिंदे सरकारने न्याय दिला. या नियुक्त्यांचे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळू नये याबाबत कुणी राजकारण करतंय का हे शोधले पाहिजे. गेल्या सरकारच्या काळात या नियुक्त्या रखडल्या होत्या. एका उमेदवाराने आत्महत्या केली होती. तेव्हा कुणी आवाज उठवला नाही. शिंदे सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेतलाय. पण आता यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC ) उमेदवारी दिलेल्या 111 जणांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे. आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या 111 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार होतं. नियुक्ती पत्र देण्याविरोधात तातडीची याचिका दाखल केलेल्या तीन EWS उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठापुढे आज यासंबंधित तातडीची सुनावणी घेण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1143 जागा भरण्यात आल्या होत्या. त्यापैकी 111 नियुक्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून आता नियुक्तीपत्र देता येणार नाही.

error: Content is protected !!