सर्वोच्च न्यायालयाने नोटबंदीच्या विरोधातील ५८ याचिका फेटाळल्या
दिल्ली – नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली जो नोटबंदीचा निर्णय घेतला होता तो योग्यच होता असे सांगून नोटबंदीच्या विरोधातील ५८ याचिका सर्वोचं न्यायालयाने फेटाळल्या आहेत यात महाराष्ट्रातील एका याचिका कर्त्याचा समावेश आहे
नोटबंदी चुकीची असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय मोठा निर्णय दिला आहे. 201६ ची नोटबंदी वैध असून सर्वच्या सर्व 58 याचिका घटनापीठानं ४-१ च्या बहुमतानं फेटाळल्या आहेत. नोटबंदी अवास्तव नव्हती आणि निर्णय घेण्यात कोणताही दोष असल्याचं आढळून आलेलं नाही, असंही मत यावेळी न्यायालयानं व्यक्त केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. आज सर्वोच्च न्यायालयानं नोटबंदी वैध असल्याचं मत नोंदवलं आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात नोटबंदीविरोधात तब्बल ५८ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यापैकी एक याचिका परभणीच्या शेतकऱ्यांची होती. नोटबंदीत लालफितीच्या कारभारामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये अडकले आहेत. आजच्या या निर्णयानंतर शेतकरी सरन्यायाधीशांच्या याचिकेसमोर आपली याचिका दाखल करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर 201६ ला देशात नोटबंदी जाहीर केली अन् सर्वत्र एकच खळबळ माजली. याच नोटबंदीचा परभणीच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. 2 शेतकरी नोटबंदीच्या 6 वर्षानंतरही आपले पैसे बदलून मिळतील या आशेनं संघर्ष करत आहेत.