ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ठाकरे गटात मोठी फूट पडण्याची शक्यता – माजी आमदार राजन साळवी भाजपच्या वाटेवर

राजापूर – . शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोकणातील बडा नेता भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. ठाकरे गटाचे कोकणातील ताकदवान नेते तथा लांजा राजापूरचे माजी आमदार राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोकणात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राजन साळवी यांचा भाजपच्या शिर्डी येथील १२ जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनात प्रवेश निश्चित आहे. भाजप संघटन पर्वाचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये राजन साळवी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राजन साळवी हे कट्टर शिवसैनिक आहेत. साळवी यांना गेल्या अडीच वर्षात अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. राजन साळवी यांना एसीबी आणि ईडीच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. तपास यंत्रणांकडून त्यांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या. पण तपास यंत्रणांच्या तपासाला सामोरं जात ते खचले नाहीत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यामागे अतिशय खमकेपणाने साथ दिली. आपण उद्धव ठाकरे यांच्यामागे कायम असू, असं ते कायम म्हणाले. पण अचानक आता ते भाजपात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोकणाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडून वेळोवेळी साळवी यांचं कौतुक करण्यात आलं आहे. असं असताना ठाकरेंचा ताकदवान शिलेदाराला आपल्या पक्षात वळवण्यात भाजपला यश येणार असल्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!