ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रविश्लेषण

ज्वालामुखी अण्वस्त्रांचा


युक्रेन आणि रशिया यांच्यात सध्या जे युद्ध भडकले आहे त्यात रशियाचे युक्रेन बाबतचे गणित चुकलेले आहे. रशियाला वाटले होते की दोन दिवसात युक्रेन गुडघे टेकायला लाऊ पण झाले उलट या युद्धात रशियावरच गुडघे टेकाया पाळी आलीय कारण एकीकडे युक्रेन कडून रशियाला कडवा प्रतिकार सुरू आहे तर दुसरीकडे अमेरिकेसह युरोप मधले 27 नाटो देश युक्रेनच्या पाठीशी उभे आहेत आणि जरी ते युद्ध भूमीवर उतरलेले नसले तरी युक्रेन शस्त्रांची मोठी मदत करत आहे शिवाय युरोपियन देशांनी रशियाच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केल्याने पुतीन इतके भडकले आहेत की त्यांनी यूक्रेंवर अणुबॉम्ब तकायची धमकी दिली आहे.अर्थात रशियाने युक्रेन वर अणुबॉम्ब टाकला तर त्याचे भयानक परिणाम बघायला मिळतील .कारण दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर जे अणुबॉम्ब टाकले होते त्याचे किती भयंकर परिणाम जगणे पाहिले आहेत त्यामुळे रशियाने युक्रन वर अणुबॉम्ब टाकला तर नाटो राष्ट्र गप्प बसणार नाहीत आणि जगात विनाशकारी अणू युद्धाचा भडका उढेल आणि तसे झाले तर संपूर्ण जगाचा विनाश अटळ आहे त्यामुळे पुतीन सारख्या सनकी माणसाच्या मनमानीला रोखणे गरजेचे आहे कारण जगात सर्वाधिक ६५२५ अणुबॉम्ब रशियाकडून आहेत.त्याखालोखाल अमेरिकेकडे ६१८५ अणुबॉम्ब आहेत युरोप मध्ये फक्त फ्रान्स कडे 300 अणुबॉम्ब आहेत.तर चीनकडे 290 पाकिस्तान सारख्या भिकाऱ्या कडे जनतेच्या पोटाला दोन घास नसले तरी 140 अणुबॉम्ब आहेत तर भारताकडे जवळपास 150 अणुबॉम्ब आहेत.याचा अर्थ जगाच्या विनाशाची सर्व साधन सामुग्री जगातील प्रत्येक देशाकडे आहे.फक्त ठिणगी पडयची खोटी आहे कधीही भडका उडू शकतो.अशी आज परिस्थिती जगात आहे म्हणूनच रशियाला अणुबॉम्ब वापर करण्यापासून रोखायला हवे.

रशियाची मुजोरी संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनली आहे.आणि ही मुजोरी जर सहन केली तर जगातील प्रत्येक छोटे राष्ट्र रशिया सारख्या महसत्तांचे गुलाम बनेल आज जे चित्र युक्रेन मध्ये बघायला मिळत आहे तेच उद्या तैवान मध्ये बघायला मिळेल कारण तैवांवर चीन आपला अधिकार सांगत आहे पण तैवान चीनला जुमनायला तयार नाही तिथेही अमेरिका ,इंग्लंड,फ्रान्स,जपान ,जर्मनी आणि भारत यांचा तैवानला पाठींबा आहे पण युक्रेन युद्धात अमेरिकेने ज्या पद्धतीने युकरेंची फसवणूक केली त्यामुळं आता अमेरिकेवर जगातल्या कुठल्याही राष्ट्रच विश्वास राहिलेला नाही त्यामुळे चीनने जर तैवान वर हल्ला केला तर अमेरिका ताबडतोब तैवान साठी रशियाच्या विरोधात उभी राहील याची शाश्वती नाही आणि म्हणूनच रशिया असो अमेरिका असो की चीन असो या महासत्ता वर जगातल्या कुठल्याही राष्ट्रांनी विश्वास ठेऊ नये कारण या महासत्ता साम्राज्य विस्तारासाठी कुणाचाही बळी घेऊ शकतात.या महासताकडे अण्वस्त्र आणि रासायनिक अस्त्रांचा मोठे भांडार आहे आणि त्याचा कधीही वापर करायला ते मोकळे आहेत पण इतरांनी मात्र तसे करू नये तसे केल्यास तो मोठा गुन्हा ठरतो आणि अशा गुन्ह्यात जी शिक्षा सद्दाम हुसेन याला देण्यात आली तीच इतरांनाही दिली जाऊ शकते .आणि हे सगळ अण्वस्त्रांच्या ताक्तीवर सुरू आहे म्हणूनच रशियाला रोखणे गरजेचे आहे अमेरिका आणि नाटो ने आता उंटावरून शेळ्या हाकणे थांबवावे आणि रशियाला रोखण्यासाठी युक्रेनच्या बाजूने रणांगणात उतरावे तरच रशियाच्या मुजोरीला शह बसेल

error: Content is protected !!