विधानसभा अधिवेशनात सरकारची कसोटी
मुंबई/ आजपासून मुंबईत राज्य विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.मात्र शिवसेना भाजपतील संघर्ष पाहता हे अधिवेशन वादळी ठरणार असून 11 मार्चला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत त्यामुळे या अर्थसंकल्पात जनतेसाठी काय वाढून ठेवले आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने विधी मंडळाचे पूर्ण वेळ अधिवेशन होऊ शकले नाही केवळ दोन तीन दिवसांचे अधिवेशन घेऊन अधिवेशनाची औपचारिकता पार पाडण्यात आली पण यावेळी 3 ते 25 मार्च असे जवळपास तीन आठवडे आधी ईशान होणार आहे आणि यात मागील प्रलंबित विधेयके तसेच काही नवीन विधेयके मांडली जातील .या अधिवेशनात चर्चेसाठी अनेक कळीचे मुद्दे आहेत त्यात आघाडी सरकारं मधील मंत्र्यांचे सोमयाने उघडकीस आणलेले घोटाळे ,एस टी चां तीन महिने सुरू असलेला संप ओबीसी,मराठा आरक्षण,शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विरोधी आमदारांवर झालेली पोलीस कारवाई ,शिवाय कायदा व सुव्यवस्था आणि महिलांवरील अत्याचार अशा विविध प्रश्नांवर सरकारला घेरण्याची विरोधकांनी तयारी ठेवली आहे खास करून नवाब मलिक यांनी बॉम्ब स्फोटातील आरोपींकडून केलेली जमीन खरेदी हे सगळे कळीचे मुद्दे असल्याने त्यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे विरोधी पक्ष नेते फडणवीस आणि दरेकर यांनी आधी सरकारला धारेवर धरण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे तर विरोधकांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी सरकारने सुधा तयारी केली आहे .त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार आहे
बॉक्स
चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
नेहमी प्रमाणे सरकारच्या कामावर नाराज असलेल्या विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे यावेळी विरोधकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर सरकारला जाब विचारणार असल्याचे सांगितले तर विरोधकांच्या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले