ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

त्रिपुरा नागालँड मध्ये भाजप तर मेघालय मध्ये त्रिशंकू-नागालँड मध्ये राष्ट्रवादी ,आणि आठवलेच्या पक्षाने खाते उघडले


कोहिमा – त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि नागालँड मध्ये भाजप आघाडीने ६० पैकी ३६ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले तसेच त्रिपुरा मधेही भाजपने ३३ जागा मिळवून आपली सत्ता कायम राखली पण मेघालय मध्ये सत्ताधारी एनपीपी पक्षाने २६ जागा जिंकून भाजपसमोर आव्हान उभे केले आहे
राज्यातील चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला असला तरी पक्षासाठी चांगली बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँड विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागांवर विजय मिळवला असून एका जागेवर आघाडीवर आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरला आहे. तर, दुसरीकडे रामदास आठवले यांच्या पक्षाच्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे. तर, दोन ठिकाणी त्यांचे उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिलेत.

error: Content is protected !!