मुंबई विद्यापीठाच्या स्पेलिंग मिस्टेक चा १.६४ विद्यार्थ्यांना फटका
मुंबई/संपूर्ण जगात ज्या मुंबई विद्यापीठाचे नावलौकिक आहे त्या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाचा कारभार किती भोंगळ आहे ते पुन्हा एकदा उघडकीस आलेले आहे विद्यापीठाने चक्क मुंबईच्या नावातच स्पेलिंग मिस्टेक केलेली आहे मुंबई ऐवजी मुंबाबाई असे उच्चार असलेले स्पेलिंग छापल्यामुळे मुंबई विद्यापीठातून पदवी घेतलेल्या २०२३/२४ बॅचच्या १.६४ लाख इतक्या विद्यार्थ्यांना फटका बसला आहे विद्यापीठ आता या सर्व विद्यार्थ्यांना दिलेली सर्टिफिकेट स्वतःच्या खर्चाने बदलून देणार आहे या घटनेबाबत विद्यापीठाने स्पष्टपणे दिलगिरी व्यक्त केली आहे मात्र संताप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे अशा प्रकारची स्पेलिंग मिस्टेक एका नामवंत विद्यापीठाकडून होतेच कशी असा सवाल विद्यापीठाच्या पदवीधर विद्यार्थ्यांनी प्रशासनाला केला आहे मुंबई विद्यापीठाचे जगात फार मोठे नाव आहे हे विद्यापीठ 1857 साली म्हणजे स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात स्थापन झालेले आहे अशा प्रतिष्ठित विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना दिली जाणारी पदवीची सर्टिफिकेट जर चुकीच्या पद्धतीने देण्यात आली तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी आणि या प्रकल्प जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी शिक्षण तज्ञ तसेच विद्यार्थी संघटनांनीही केली आहे
