ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

आजपासून महागाईचे नवे पर्व सुरू

करोना आणि लॉक डाऊन चां दुष्ट संकटातून आताच कुठे माणूस सावरला आहे .त्यामुळे पण संसाराची आर्थिक घडी अजूनही नीट बसलेली नाही.कारण नुकताच कुठे काम धंदा सुरू झाला आहे पण येणारा पगार लॉक डाऊन च्या काळातील कर्ज फेडण्यावर खर्च होत आहे अशावेळी देशातील जनतेला सावरण्यासाठी सरकारने आणखी काही काळ सवलत द्यायला हवी होती पण सवलत देणार कोण? कारण केंद्रात जे भाजपचे सरकारने आहे ते व्यापाऱ्यांचे सरकार आहे त्यामुळे त्यांना सखाराम तुकाराम यांच्या सारख्या गोरगरीब आणि मध्यम वर्गीयाची काळजी नाही त्यांना काळजी आहे अंबानी,अडाणी यांच्या सारख्या उद्योगपतींची! म्हणूनच कोरोना काळात रिकामी झालेली सरकारी तिजोरी भरण्यासाठी केंद्राने पुन्हा एकदा सामान्य माणसाच्या खिशात हात घालायला सुरुवात केली आहे आणि आज पासून लोकांना खऱ्या अर्थाने महगाईचे चटके जाणवू लागतील.कारण गेल्या महिन्यात रशिया युक्रेन युद्धाचे कारण पुढेकरून तब्बल 8 वेळा पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्यात आलेत त्यामुळे मुंबईत डिझेल ने शंभरी गाठली आहे जेंव्हा डिझेल वर दरवाढ होते तेंव्हा त्याचा फटका मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना बसतो त्यामुळे ते भाडेवाढ करतात परिणामी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतात.मुंबईमध्ये काही शेती होत नाही त्यामुळे अन्नधान्य आणि भाजीपाला बाहेरून म्हणजे ग्रामीण भागातून येतो पण डिझेलचे दर वाढल्याने मालवाहतुकीच्या भाड्यात वाढ होणार आहे आणि त्यानंतर गहू तांदळापासून भाजी आणि मीठ मासाल्यापर्यंत सर्व वस्तूंचे दर वाढणार आहेत.महापुरुष एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दराठी 60 ते 100 रुपयांपर्यंत वाढ करायचे ठरवले आहेत त्यामुळे आता गरीब मध्यम वर्गीय माणसाला गॅस परवडणारा नाही परिणामी घरातच आता चूल पेटण्याची वेळ आली आहे .प्रवासी भाडे वाढणार आहे.बँकांचे होम लोन आणि इतर कर्जांच्या दरात वाढ होणार आहे पोस्टातील कमापंजीवरचे व्याज आता रोखीने मिळणार नाही पी एफ च्या व्याज दरात सुधा मोठे बदल करण्यात आले आहेत.थोडक्यात सामान्य माणूस कोणत्याही परिस्थितीत जास्त दिवस जगणार नाही आणि जगला तरी त्याला मुंबई सारख्या शहरांमध्ये जास्त दिवस काढता येणार नाहीत याची केंद्र सरकारने पुरेपूर व्यवस्था करून ठेवली आहे.आणि यालाच म्हणतात अच्छे दीन!

लोकांना या सगळ्या गोष्टींची जाणिव असूनही लोक गप्प आहेत.कारण त्यांना भाजप वाल्यांनी धर्माच्या अफूची गोळी दिलेली आहे.केंद्राच्या महागाई विरुद्ध लोकांनी जरा आवाज उठवला की जाती धर्माचे विषय पुढे आणायचे आणि लोकांचे विचार करायचे हेच भाजपचे धोरण आहे आणि या देशातील लोक सुधा त्यांच्या या धोरणाला बळी पडत आहेत.वाढती महागाई,वाढत भ्रष्टाचार जाती धर्माच्या नावाने वाढते दंगे आणि त्यातून निर्माण झालेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न याच कुणालाच काही पडलेलं नाही.लोक जगायचं म्हणून जगात आहेत त्यांचं मन,त्यांच्या भावना त्यांची विचार करायची शक्ती सर्व काही मेलेल आहे.आंकी लोक येवढं सगळ होत असतानाही वेग वेगळ्या राजकीय पक्षांचे आणि त्यांच्या नेत्यांचे गुलाम बनलेले आहेत आणि म्हणूनच या देशात खता न वही मोदी कहे वही सही असे प्रकार आहेत त्यामुळे भलेही आजपासून महागाईने जगणे मुश्कील केले असेल तरी आवाज उठवायचा नाही कारण गुलामांना आवाज उठवण्याची परवानगी नसते आज 140 कोटी भारतीय राजकीय पक्षांचे आणि त्यांच्या नेत्यांचे गुलाम बनलेत त्यामुळे त्यांनी गुलामासारखेच जगायचे आणि गुलामासारखेच मरायचे!

error: Content is protected !!