ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

उभारू नव संकल्पाची गुढी


आज गुढी पाडवा ! साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त ! गुढी पाढव्याने हिंदू नव वर्ष रभ होतो.त्यामुळे घरावर गुढ्या तोरणे उभारून नववर्षाचे स्वागत करण्याची पद्धत आहे. नव वर्षाचा आज प्रारंभ असल्याने आजच्या दिवशी नवे संकल्प करायचे असतात आणि पुढे वर्षभर ते संकल्प तडीस नेण्यासाठी प्रयत्न करायचे असतात.या वर्षीच्या गुढी पाडव्याच्या वैशिष्ट म्हणजे हा गुढीपाडवा निर्बंध मुक्त असणार आहे कारण गेली दोन वर्ष कोरोणामुळे जे निर्बंध लादण्यात आले होते त्यामुळे लोकांना कुठलाही संन मनमोकळेपणाने आणि उत्साहात साजरा करता आला नाही पण या वर्षी दोन दिवस अगोदरच सरकारने सर्व निर्बंध हटविले त्यामुळे आता खऱ्या अर्थाने लोकांना मोकळा श्वास घेता येणार आहे .आणि त्याची सुरुवात गुढी पाडव्या पासून होतेय हा दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल! पाढवा का साजरा केला जातो त्याचे इतिहासिक ,पौराणिक आणि धार्मिक महत्व काय ते लोकांना सांगायची गरज नाही आणि आजकाल लोक ते जाणून घेण्याच्या भानगडीत सुधा पडत नाहीत.लोक प्रत्येक सन केवळ इव्हेंट म्हणून साजरा करतात त्यामुळे सणांचे धार्मिक महत्व हळू हळू कमी होऊ लागले आहे आणि त्यात काहीच गैर नाही कारण आजची पिढी विज्ञानवादी आहे त्यामुळे या पिढीचा वास्तवावर अधिक विश्वास आहे परिणामी जुन्या भाकडकथा वर कुणी विश्वास ठेवत नाही .गेल्या काही वर्षांपासून मुंबई पुण्या सारख्या महा नगरामध्ये गुडी पाडव्याच्या दिवशी रस्त्यावर मैदानात मोठमोठ्या रांगोळ्या काडल्या जातात तसेच शोभा यात्रा कडल्या जातात आणि त्यातून हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवले जाते.या शोभा यात्रांमध्ये महिला पारंपरिक वेशात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होतात हे दृश्य खरोखर स्त्री पुरुष समानतेचे दर्शन घडवते. कारण पूर्वी सणांच्या दिवशी सुधा महिलांना घराबाहेर पडायला बंदी होती पण आता शोभायातरांमध्ये महिलांना पारंपरिक वेशात बुलेट चालवताना पाहिलं की माझा भारत कुठे तरी काळा प्रमाणे बदलतोय याची परचीती येते त्यामुळे प्रत्येकाने या गोष्टीचे स्वागत आणि शोभा यात्रांमध्ये सामील होणाऱ्या महिलांचा सन्मान करायला हवा.आज मुंबईच्या रस्त्यावर ते दृष बघायला मिळणार आहे.आणि प्रत्येक परिवर्तनवादी मुंबई कारसाठी ते दृश्य निश्चितच आशादायी असेल कारण त्यातून हिंदू धर्मातील जुनाट रूढी परंपरा कालबाह्य झाल्याचे आणि सर्व जातींना सामावून घेणारा ,तसेच उच नीच तेच्या पलीकडे बघणारा एक नवा परिवर्तनवादी हिंदू धर्म बघायला मिळणार आहे त्यामुळे हे चित्र निश्चितच हिंदू धर्मियांसाठी आशादायी आहे .

गुढी पाडवा म्हटलं की नव वर्षाच्या निमित्ताने नव संकलपाचा दिवस! त्यामुळे प्रत्येकाने नव संकल्प करायला हवेत स्वतःसाठी,आपल्या कुटुंबासाठी,आणि आपल्या देशासाठी सुधा नाव संकल्प करायला हवेत कारण आज देशाची सामाजिक स्थिती खूप वाईट आहे .देशात हिंदुत्ववादी भाजप सरकार आल्यापासून इथल्या हिंदू एतर समाजाचे जगणे मुश्कील झाले आहे दलीत मुस्लिम समाजात असुरक्षिततेची भावना आहे. या देशात नेमके आपले काय स्थान आहे हे तपासून बघण्याची वेळ दलीत मुस्लिमांवर आली आहे.देशाच्या मूळ प्रवाहाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न काही लोकं करीत आहेत त्यामुळे देशातील इतर धर्मीयांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची वातावरण आहे.परिणामी या देशाची धर्म निरपेक्षता धोक्यात आली आहे. त्यातून यादवी निर्माण होऊन देशाची आणखी एक फाळणी होते की काय असे आता वाटायला लागले आहे आणि म्हणूनच हे सर्व बदलण्याचा संकल्प आज करायला हवा त्यासाठी दलीत मुस्लिमांनी एकत्र यायला हवय तरच या देशात त्यांचे अस्तित्व टिकून राहील पण आम्ही तुमच्या धर्माचा संस्कृतीचा आदर करीत असताना तुम्ही आमच्या धर्माचा अनादर का करताय हाच खरा प्रश्न आहे पण काहींना ते मान्य नाही कारण त्यांना या देशाला हिंदुराष्ट्र बनवायचे आहे म्हणूनच अशा प्रवृत्तींना रोखण्याची आणि या देशाची एकता व अखंडता कायम राखण्याचा आज सर्वांनी संकल्प करायला हवा

error: Content is protected !!