ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

शिवसेना राष्ट्रवादीत मतभेदाची गुढी

गृहमंत्री पदावरून आघाडीत बिघडी ?
मुंबई/ भाजपच्या नेत्यांविरोधात तक्रारी करूनही गृहमंत्री कारवाई करीत नाहीत त्यामुळे गृहमंत्रीपद शिवसेनेला मिळावे आणि मुख्यमंत्र्यांनी ते स्वतःकडे घ्यावे अशी मागणी शिवसेनेने केली असून राष्ट्रवादीने त्यास नकार दिला आहे त्यामुळे आता गृहमंत्री पदावरून आघाडीत बीघाडी निर्माण झाली आहे.
सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यात निकराची लढाई सुरू आहे. आणि आघाडीचे सरकारं असूनही तसेच भाजपच्या नेत्यांच्या घोटाळ्या बाबत अनेक पुरावे देऊनही गृहमंत्री भाजपच्या नेत्यांवर कारवाई करीत नाहीत . त्यामुळे त्यांच्याकडचे गृहमंत्रीपद शिवसेनेला द्यावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे.संजय राऊत यांनी सुधा याबाबत नाराजी व्यक्त करताना ज्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असते त्यांच्याकडेच गृहमंत्रीपद हवे असे म्हटले होते .त्यानंतर काल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांची भेट घेवून त्यांच्या बरोबर तासभर चर्चा केली . त्यानंतर माझ्या सहकारी मंत्र्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले दरम्यान या वादावर बोलताना भाजपचे नेते सुधीर मुंगटीवार यांनी सांगितले की भाजप नेत्यांवर सुड उगवण्यासाठीच शिवसेनेला गृहमंत्रीपद हवे आहे त्यामुळे गृहमंत्री पदावरून निर्माण झालेला हा वाद आता चांगलाच चिघळणार आहे .काल सायंकाळी या वादावर चर्चा करण्यासाठी पुन्हा एक बैठक झाली आणि हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आले .
लीड

error: Content is protected !!