ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्र

हिम्मत असेल तर आता निवडणूक घेऊन दाखवा
उद्धव ठाकरेंचे शिंदे – फडणवीस याना जाहीर आव्हान


संभाजी नगर – हिम्मत असेल तर आता निवडणूक घेऊन दाखवा असे पुन्हा एकदा जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस याना केले आहे ते पुढे म्हणाले तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, आता वडिलही चोरायला निघालात, आता मी गप्प बसणार नाही, हिंमत असेल तर मोदींच्या नावाने मतं मागा, मी बाळासाहेबांच्या नावाने मागतो, मग पाहू महाराष्ट्र कुणाच्या मागे आहे असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे-भाजप सरकारला दिलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून टीका केली.
भाजपने न्यायव्यवस्था ही आपल्या हातात घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ज्या दिवशी न्यायालय यांच्या बुडाखाली जाईल, तो दिवस लोकशाहीचा शेवटचा दिवस असेल असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. इस्त्रायलमध्ये हाच प्रकार होत असून त्याच्याविरोधात सगळी जनता आणि अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरल्याचं दिसलं. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत विरोधी पक्षांना त्रास दिला जातोय, मेघालयात ज्या संगमांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता, आता त्यांच्याबरोबर सत्ता स्थापन केली. भारतीय जनता पक्ष म्हणून भ्रष्टाचारांना सोबत घेत असाल तर भारतीय जनतेचा अपमान आहे. तुमचे हिंदुत्व आम्ही मानणार नाही. आधी भाजपच्या व्यासपीठावर साधू संत दिसायचे आता संधीसाधू दिसतात. सावरकर याचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत आहे का?
अमित शाह म्हणाले की उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, पण जमीन दाखवायची असेल तर पाकव्याप्त काश्मीरची एक इंच जमीन घेऊन दाखवा, तर आम्ही मानू. वल्लभभाईंचा पुतळा उभा केला, देशभरातून पोलाद गोळा केले, पण त्या पोलादाचा एक कण तरी धमन्यामध्ये आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
तुम्ही मोदींच्या नावाने मतं मागा, मग समजेल महाराष्ट्राची जनता कुणाच्या मागे आहे; उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान
माझा पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला, वडीलही चोरायचा प्रयत्न केला, त्यांच्या वडिलांना काय वाटत असेल अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला. जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मोदींच्या नावे मतं मागा, मी माझ्या बापाच्या नावाने मतं मागतो, मग समजेल महाराष्ट्र कोणाच्या मागे आहे असं आव्हानही त्यांनी दिलं.
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असताना भाजपला हिंदू आक्रोश करावा लागतोय हे दुर्दैवी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
या देशाचा पंतप्रधान हिंदू असतानाही भाजप हिंदू आक्रोश यात्रा काढते, म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना या देशात हिंदू सुरक्षित नाहीत का असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला.
आपण काही करायचं नाही, नुसतं कोंबडं झुंजवत बसायचं, यांनीच दंगली केल्या; उद्धव ठाकरेंचा आरोप
या आधीही मी संभाजीनगरला आलोय, याच शहरात१९८८ साली महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आली आणि शिवसेनाप्रमुखांनी या शहराचं नाव बदललं, संभाजीनगर. गेली २५ वर्षे आपण भ्रमात होतो, भाजपसोबत आपली युती होती. पण औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर झालं नव्हतं. पण महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि भाजपला जे जमलं नाही ते आम्ही करुन दाखवलं. करायचं काय नाही, नुसतं कोंबडं झुंजवत बसायचं ही भाजपची खेळी. दंगली
एका बाजूला पदवी दाखवूनसुद्धा युवकांना नोकरी मिळत नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी विचारली तर २५ हजारांचा दंड भरावा लागतो. आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी पंतप्रधान झाला, त्याचा अभिमान त्या महाविद्यालयाला कसा झाला नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला

साईबाबांनी त्यांच्या हयातीत वैदिक परंपरा जपल्या आहेत. त्यामुळे साईसंस्थाकडून साई मंदिरात आजही वैदिक परंपरा जपल्या जातात. साईबाबांना नावं ठेवणारी अनेक लोकं आजपर्यंत आली गेली, मात्र आम्ही बाबांच्या शिकवणुकीप्रमाणे चालतो. धीरेंद्र शास्त्रींनी महाराष्ट्राची संत परंपरा समजून घ्यावी आणि साईभक्तांच्या भावना दुखावणारे वक्तव्य करू नये, असा सल्ला साईमंदिराचे सेवानिवृत्त मुख्य पुजारी बाळकृष्ण जोशी यांनी धीरेंद्र शास्त्रीना दिला आहे.

error: Content is protected !!