महायुतीच्या नेत्यांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार
मुंबई – सध्या निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय पक्ष एकमेकांवर आचारसंहिता भगांच्या तक्रारी करीत आहेत.पंत प्रधान मोदिवर निवडणुकीची मेच फिक्सिंग केल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींच्या विरुद्ध भाजपने तक्रार केली आहे तर स्टार प्रचारकांच्या यादीत महायुतीतील पक्षांनी एकमेकांच्या नेत्यांची नवे समाविष्ट केल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती विरुद्ध आचार संहिता भंगाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे.
या सर्व धामधुमीत शरद पवार गटाने शिंदे गट आणि भाजपवर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत आपल्याच पक्षाच्या नेत्यांची नावे दिली जातात. दुसऱ्या पक्षाची नावे दिली जात नाही. शिंदे गट आणि भाजपने आपल्या यादीत एकमेकांच्या पक्षातील नेत्यांचा समावेश केला आहे. हा आदर्श आचरसंहितेचा भंग असून याप्रकरणी कारवाई केली गेली पाहिजे, अशी मागणी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. कालपासून स्टार प्रचारकांची यादी येत आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे एक तक्रार केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या यादीत दोन चुका आहेत. स्टार प्रचारकांच्या यादीत व्यक्तीच्या नावापुढे त्यांचं पद लिहिलं जात नाही. तो नियमभंग ठरतो. पण शिंदे गटाच्या यादीत नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नावापुढे पदं लिहिण्यात आली आहेत. हे चुकीचं आहे. आदर्श आचारसंहितेचा हा भंग आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.