शरद पवार यांचा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा- गुगली काय ?
मुंबई- शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी आपला निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला. त्याचवेळी जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या बड्या नेत्यांना अश्रूही रोखता आले नाहीत. त्याचवेळी दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या भावनांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर काहीवेळा अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावलं, काही वेळा समजावलं, काही वेळा झापलंही. याशिवाय अजित पवारांनी शरद पवारांच्या निवृत्तीचं कारण सांगितलं. वयामुळे हा निर्णय कधी ना कधी घ्यावाच लागेल, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांचं बोलून झाल्यानंतर कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळे यांना बोलण्याची विनंती केली. सुप्रिया सुळेही समोर बसून सर्व पाहात होत्या. मात्र त्याचवेळी अजित पवार यांनी तू बोलू नकोस, मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीने सांगतोय, असं सुप्रिया सुळेंना सांगितलं
तुम्ही गैरसमज करून घेत आहात की शरद पवारांनी पद सोडलं म्हणजे ते बाजूला जातील. पण तसं होणार नाही. नवीन नेतृत्वाकडे संधी दिली जाणार आहे. उद्या येणारा नवीन अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे. कोणी येरा गबाळा अध्यक्षांची निवड करणार नाही. शरद पवार यांनी म्हटलं आहे की भाकरी फिरवायची वेळ आली आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष काम करेल. देशभरात मीटिंग करणं, लोकांना भेटणं सुरू राहिलं. कुणी पण अध्यक्ष झालं प्रांताध्यक्ष झालं तरी शरद पवार यांच्याच जीवावर पक्ष चालणार आहेत.
शरद पवार हे सर्व प्रमुखांना एकत्र बसवून निर्णय घेत असतात आणि आज अचनक हा निर्णय घेतला यांची कुणाला माहिती नव्हती. भाकरी फिरवायची म्हणाले मात्र स्वतःपासून फिरवली. उद्या नवीन अध्यक्ष झाला तर अडचण काय आहे? शरद पवारांनी हाक दिल्यावर सगळे एकत्र येणार आहेत.
खासदारकी आमदारकीबाबत सर्व निर्णय त्यांच्याबाबत तेच घेतील. हा निर्णय कालच होणार होता मात्र काल 1 मे असल्यामुळे झाला नाहीं. हा दिवस आज ना उद्या हे होणार होतं
सगळ्यांच्या भावना साहेबांनी ऐकल्या आहेत. तुम्ही गैरसमज करुन घेत आहेत. शरद पवार अध्यक्ष नाहीत म्हणून पक्षात नाही असं नाही. शरद पवार बाजू जाणार नाहीत. नवीन नेतृत्वाकडे संधी दिली जाणार आहे. उद्या येणारा नवीन अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे. शरद पवार यांनी म्हटलं आहे की भाकरी फिरवायची वेळ आली आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष काम करेल. देशभरात मीटिंग करणं, लोकांना भेटणं सुरु राहिल. कुणी पण अध्यक्ष झालं प्रांताध्यक्ष झालं तरी शरद पवार यांच्याच जीवावर पक्ष चालणार आहेत. प्रमुखांना एकत्र बसवून निर्णय घेत असतात आणि आज अचनक हा निर्णय घेतला यांची कुणाला माहिती नव्हती. भाकरी फिरवायची म्हणाले मात्र स्वतःपासून फिरवून. उद्या नवीन अध्यक्ष झाला तर अडचण काय आहे? शरद पवारांनी हाक दिल्यावर सगळे एकत्र येणार आहेत. खासदारकी, आमदारकीबाबत सर्व निर्णय त्यांच्याबाबत तेच घेतील. हा निर्णय कालच होणार होता मात्र काल 1 मे रोजी वज्रमूठ सभा असल्यामुळे झाला नाही. आज ना उद्या हे होणार होतं