शिंदेची भाजपच्या काव्यावर मात – नाशिकसह ठाणे , कल्याणही मिळवले
ठाणे – गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे , कल्याण आणि नाशिक या तीन जागा कोणाला मिळणार यावर जो चर्चेचा काथ्याकुट सूर होता तो आता संपला आहे कारण शिंदेनी आपल्या मुत्सदी पानाच्या बळावर या तिन्ही जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. त्यामुळे आता नाशिक मधून शिंदे गटाचे हेमंत गोडसे, कल्याण मधून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे व ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्के हे शिंदे गटाचे तीन उमेदवार असतील .
वास्तविक नाशिकची जागा शिंदे गटाची आहे कारण तिथून दोन वेळा हेमंत गोडसे निवडून गेले तरीही भाजप वाल्यानाचा नाशिक वर डोळा होता. त्यातच अजितदादांची राष्ट्रवादी सुधा नाशिकवर हक्क सांगत होती. पण गोडसे यांनी प्रयत्न सोडले नाहीत भाजपा आणि मित्र पक्षांच्या नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्या स्वत शिंदे यांनी भाजपा नेत्या समोर नाशिकचा आग्रह धरला त्यामुळे भाजपचा नाशिक ढापण्याचा डाव फसला आणि नाशिक शिंदे गटाला मिळाले . तर ठाण्यातून माजी महापौर आणि शिंदे गटाचे नेते नरश म्हस्के यांना उमेदवार मिळाली . ठाण्यावर सुधा भाजपा वाल्यांचा डोळा होता पण तिथेही त्यांची दाल शिजली नाही . आणि कळ्यांची जागा तर मुख्यमंत्र्यांच्या मुलाची तिथेही भाजपवाले त्रय करीत होते पण जमले नाही