ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

बुलढाण्यात भीषण अपघात विदर्भ ट्रॅव्हलच्या बसला आग लागून 26 प्रवाशांचा मृत्यू


बुलढाणा/काल मध्यरात्री समृद्धी महामार्गावर वर सगळ्या मोठा अपघात झाला आहे .कारंजा वरून पुण्याकडे निघालेली विदर्भ ट्रॅव्हल्सची बस बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातल्या पिंपळखुटी गावाजवळ येतात या गाडीचे टायर फुटले आणि बस पलटी झाली त्यामुळे डिझेलच्या टाकीतून डिझेलची गळती होऊन गाडीने पेट घेतला या भीषण अपघातात बस मधल्या 33 पैकी 26 प्रवाशांचा मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला सध्या घटनास्थळी बचाव पथक पोचले असून मंत्री गिरीश महाजन यांनीही घटनास्थळाला भेट दिली आहे.त्याचबरोबर दुपारपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा घटनास्थळी पोचणार आहे. दरम्यान या भीषण अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून तीव्र दुःख व्यक्त केले आहे तर महाराष्ट्र सरकारने अपघातातील मृतांना मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखाची मदत जाहीर केली आहे तर जखमींना 50 हजार रुपये दिले जाणार आहे समृद्धी महामार्ग हा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे. यापूर्वी या मार्गावर बरेच अपघात झालेले आहेत आणि आजचा अपघात हा सगळ्यात भीषण अपघात मानला जात आहे.

error: Content is protected !!