ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक मुंबईतील दोन्ही जागा ठाकरे गटाने जिंकल्या- कोकणची जागा भाजपला तर नाशिकची शिंदे गटाला


मुंबई/विधान परिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मुंबई शिक्षक मतदार संघ आणि मुंबई पदवीधर मतदार संघात ठाकरे गटाची दोन्ही उमेदवार विजयी झाले. तर कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपचे निरंजन डावखरे निवडून आले. नाशिक शिक्षक मतदार संघातून शिंदे गटाचे किशोर दराडे विजयी झाले
२६ जून रोजी विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक झाली होती. मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अनिल परब विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे किरण शेलार यांच्यात लढत झाली. या लडतीत अनिल परब यांनी 44 हजार 478 मतांनी विजय मिळवला. तर मुंबई शिक्षक मतदार संघात ठाकरे गटाचे ज .गो. अभ्यंकर यांनी राष्ट्रवादीच्या शिवाजीराव नलावडे यांचा पराभव केला. कोकण पदवीधर मतदार संघात भाजपचे निरंजन डावखरे यांनी काँग्रेसच्या रमेश कीर यांना पराभूत केले.डावखरे सलग तीन वेळा विधान परिषदेवर निवडून गेले. तर नाशिक शिक्षक मतदार संघात शिवसेना शिंदे गटाच्या किशोर दराडे यांनी ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांचा पराभव केला. विधान परिषदेची ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. परंतु नाशिक मध्ये आणि मुंबई शिक्षक मतदार संघात महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद होते. नाशिकमध्ये तर शिंदे गटाच्या किशोर दराडे यांच्या विरोधात भाजपचे दोन ,तर अजित पवार गटाचा एक बंडखोर उभा होता. महायुतीमधील या फाटाफुटीमुळेच दराडे यांच्या मतदानावर मोठा परिणाम झाला. परंतु कसे का होईना अखेर ते निवडून आले.

error: Content is protected !!