ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

अंधेरीत कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर बारवाल्याचा पोलिसांवर हल्ला


मुंबई: पुण्यात एकीकडे बार आणि पबमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणानंतर गोंधळ उडाला असताना दुसरीकडे आता मुंबईतही अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं समोर आलं आहे. अंधेरी पश्चिमधील एका बारमध्ये हुक्का विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यास गेलेल्या पोलिसांना बार मॅनेंजरने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी त्या बार मॅनेंजरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अंधेरी पश्चिमेत आंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ‘द लिटिल डोर बार’मध्ये हुक्का विक्री चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना बार मॅनेजरकडून शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. बारमध्ये हा गोंधळ सुरू असताना पोलिस स्टेशनमधून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. त्यानंतर मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी या बारमध्ये दाखल झाले आणि त्यांनी बारची तपासणी केली. नंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या त्या बार मॅनेजरलाही अटक केली.
अटक आरोपी बार मॅनेजरचे नाव जॉन नॉर्बर्ट फर्नांडिस आहे. बार मॅनेजरकडून पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामुळे पोलिसांमध्ये नाराजीचा सूर आहे. आंबोली पोलिसांनी बारवर कारवाई करत हा बार तीन दिवसांसाठी बंद केला आहे.

error: Content is protected !!