ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौर्‍यात सेना- भाजपा मध्ये धमासान

भाजपा कार्यकर्त्यांची निवेदने स्वीकारण्यास उद्धव ठाकरे यांनी स्वीकारली नाहीत
सांगली/ सध्या सेना भाजपातील कटुता आतापर्यंत मुंबई सारख्या शहरातच दिसत होती. पण आता ग्रामीण भागातील रस्त्यांवर सुधा दिसायला लागली आहे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूरग्रस्त सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावार असताना त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांची निवेदने घेतली नाहीत. त्यामुळे भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शिवसेना व उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी तेथे शिवसैनिक सुधा आले आणि दोन्हीकडून घोषणा युद्ध सुरू झाले पोलिसांनी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना आडवले नसते तर मोठा राडा झाला असता.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरें पूरग्रस्त सांगली दौर्‍यावार गेले होते तेथे त्यांनी पूरग्रस्त भिलवडी गावातील नुकसानीची पाहणी केली आणि कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन दिले तसेच दिग्रज,अंकलखोप आदी भागातील पूरपरिस्थिती आणि नुकसानीची पाहणी केली यावेळी त्यांच्या सोबत मंत्री विश्वजीत कदम यांच्यासह महा विकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते होते मात्र सांगलीतील हरबत रोडवर त्यांचा ताफा आला असता तेथे व्यापाऱ्यांनी आणि विविध संघटनांनी त्यांची गाडी अडवली यावेळी व्यापाऱ्यांची आणि इतर संघटनांची निवेदने त्यांनी घेतली पण भाजपच्या कार्यकर्त्यांची निवेदने घेतली नाहीत त्यामुळे रस्त्यातच त्यांनी ठिया मांडला आणि घोषणाबाजी सुरू केली. त्याला शिवसैनिकांनी जशास तसे उत्तर दिले .त्यानंतर पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले .या गोंधळानंतर सांगलीत मोठा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान दौर्‍या नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की आपतीची वारंता पहिली तर त्याचे स्वरूप भीषण होतेय. प्रचंड प्रमाणात पाऊस,दरडी खचत आहेत.निसर्गसमोर हतबलता असते.पुराच्या पाण्यामुळे पुल वाहून गेले .घाट रस्ते खचले नदीपात्रातील पूर रेषेची अमलबजावणी होत नसेल तर काय अर्थ आहे ? अतिक्रमणे झाली आहेत काही ठिकाणी वस्त्यांचे पुनर्वसन करावे लागेल.आपतिग्रस्तणा तात्काळ मदत करणे सुरू झाले आहे.सांगली प्रशासनाला नागरिकांनी चांगले सहकार्य केले या संपूर्ण भागात काही लाख लोकांचे स्थलांतर केल्यानेच त्यांचे जीव वाचले असेही त्यांनी सांगितले .पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन करून ते दुष्काळग्रस्त भागाकडे वळवणे महत्वाचे आहे असेही त्यांनी सांगितले. मात्र मदत पॅकेज बाबत काही सांगितले नाही.

– लोकल ट्रेन सर्वसामान्यांना यापुढेही बंद मात्र दुकानांना रात्री ८ पर्यंत परवानगी


मुख्यमंत्री उद्धव ठाकरें आणि टास्क फोर्स चे डॉकटर अजूनही कोरोंनाच्या धस्क्या मधून सावरलेले नसल्याने लोकल ट्रेन इतक्यात सर्वसामान्य लोकांसाठी सुरू करता येणार नाही असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे मात्र ज्या भागातील कोरोंना रुग्णसख्या कमी झालीय त्या भागातील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात येणार आहे

error: Content is protected !!