ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

संजय राऊत यांना 3 दिवसांची कोठडी- उद्वव ठाकरेंनी घेतली कुटुंबीयांची भेट- पुढचा नंबर कोणाचा?

मुंबई/ संजय राऊत हे केवळ शिवसेनेचे खासदार च होते असे नाही तर ते शिवसेनेचा आवाज होते पण त्यांना अटक करून शिवसेनेचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर आता पुढचा नंबर कोणाचा अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे.कदाचित आता अनिल परब यांनीही टार्गेट केले जाऊ शकते अशी चर्चा आहे
रविवारी संजय राऊत यांची त्यांच्या भांडूप येथील घरी साडे नऊ तास आणि ई डी कार्यालय जवळपास 6 तास चौकशी करण्यात आली आणि नंतर त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली पत्रा चाळ घोटाळ्यात त्यांना अटक जे आहे आणि 4 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे दरम्यान काल उद्धव ठाकरे यांनी भांडूप येथील राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला .त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन शिवसेना संपली असे म्हणणाऱ्या भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आणि संजय राऊत यांचं कोतुक केले दरम्यान राऊत यांच्या पुढचा नंबर अनिल परब यांचा आहे असे किरीट सोमय्या यांनी सांगितले कारण अनिल परब हे सुधा ई डी चां रडारवर आहेत दापोली येथील रिसॉर्ट प्रकरणी त्यांच्यावरही गुन्हा दाखल आहे त्यामुळे पुढचा नंबर त्यांचा असण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!